पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यावर लार्ड यांचे सभेत फार विपरीत संमते पडली होती. त्या कायद्यावरून जुरी यांकडे लैवल याचे निवाड्याविषयीं अखत्यार किती, याचा ठराव पुरा झाला. फ्रेंच राज्यांत फेरफार झाल्यापासून कित्येक अयोग्य पुस्तकें प्रगट झालीं, ही गोष्ट प्रधानास फार वाईट वाटली. आणि मे महिन्यांत सरकारी जाहीरनामा लाविला कीं, राज्यांतील स्वस्थतेस उपद्रव करण्याचे हे यत्न बंद करण्या- विषयीं सर्व माजिस्ट यांनीं खवरदारी ठेवावी. हा जा हीरनामा पार्लमेंट यापुढे आणिला, तेव्हां दोनही सभानीं राजास स्तुतिपत्रे पाठविलीं; आणि तसेंच राज्यांतील सर्व ठिकाणचे लोकांनीही केले. मग त्या अयोग्य ग्रंथाचे छापणारे व करणारे यांची चौकशी चालू झालो. टामस- पेन ह्मणून एके पुरुषानें त्या जातीची दोन पुस्तकें केली होती, त्यावर किंग्स्वेच्कोर्ट यांत गुन्हा लागू झाला. परंतु तो चौकशी होण्याचे पूर्वी राज्यांतून बाहेर गेला, आणि पुढे त्यास औला असे जाहीर केलें. या बैठकीत दुसरी गोष्ट एक हिंदुस्थानांतील लढा- ईची मात्र निघाली. त्या लढाईचें वर्तमान असें. संन् १७८४ मध्ये कंपनी सरकारानें टिपू साहेब याशी तह केला; तेव्हांपासून तो बळकट झाला; आणि यास फ्रेंच सरकारचा पक्ष होता, ह्मणून त्यांचे सांगण्यावरून तो इंग्रे- जी मुलुखांत उपद्रव करीत असे, असा तर्क होता. १७८९ चे उन्हाळ्यांत त्यानें कंपनी सरकारचा स्नेही त्रावणकोरचा यास डच लोकांनीं क्रांग्नोर ह्मणून किल्ला विकला होता, त्यावर हल्ला केला. संन् १७९० मे महिन्याचे १ ले तारिखेस राजानें टिपूचे फौजेवर संन् त