पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ ९००००० पौंड शिलक आहे; त्यांतला हा पैका असे पिट साहेबाने सांगितले. त्यानें दुसरे कळविले की, या संपत्तिकाळावरून पुढलें भविष्य करितां येत नाहीं खरें, तथात्ति युरोप देशचे स्थितीवरून पाहिले असतां, फार दिवस स्वस्थपणा राहील असा तर्क होतो. विलबेफ्रोस साहेबानें गुलामाचा व्यापार बंद होण्या- विषयींचें आपले वोलणें पुनः चालू केले. डंडास साहेब सरकारचा सेकतारी ह्मणूं लागला कीं, व्यापार बंद होणें याचे पूर्वी “सोई पाहून" हे शब्द असावे. त्यावर पिट साहेबाने ते नसावे ह्मणून भाषण केलें. तथापि ६९ अ- धिक संमतानें तो फेर करावा असे ठरले. तेव्हां डंडास साहेबाने ठरविलें कीं, "ब्रिटिश सरकाराचे राज्यांत व्या- पारासाठी निश्रो लोक आणणे; संन् १८०० चे जान्यु- आरी महिन्यांत बंद व्हावें.” लार्ड मार्निग्तन याने संन् १७९६ चे जान्युआरी महिन्याची १ ली तारिख केली; आणि अशीं कलमें ठरून लार्ड यांचे सभेस पाठविली. तेथे ती त्या बैठकीत तशींच राहिलीं, कारण की, त्याविषयींची शायदी सर्व सभेत ऐकावी, कामिटी इनें ऐकू नये, असे तेथें ठरले. याप्रसंगी ड्युक आफ क्लारेन्स, राजाचा तिसरा मुलगा, यानें व्यापार बंद होऊं नये, याविषयीं भा- पण केले, त्यामुळे त्याची प्रसिद्धि झाली. पूर्वीचे बैठकीमध्ये फाक्स साहेबाचे बोलण्यावरून लैवल यांचे गुन्ह्याविषयीं जुरी यांकडे अखत्यार किती आहे, हे ठरविण्याचा कायदा कामन्स समेत ठरला; परंतु लार्ड यांनीं तो रद्द केला होता. त्याविषयीं या बैठकीत फाक्स साहेबानें फिरून बोलणे चालवून तो ठरवून घेतला.