पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचा सूड उगवावयास ते प्रवृत्त झाले. दोन डिसेंटर सभांची घरें जाळून टाकिली डाक्तर प्रीस्तली ह्म- णून एक प्रख्यात विद्वान होता, त्याचें घर जाळले, त्यांतून त्यास बाहेर निघावयासही वेळ सांपडणे कठीण पडले. त्याचे घराचें सामान, पुस्तकें, आणि बहुत यंत्रेही सर्व अ गदीं जळून गेलीं. दुसरे कित्येक गृहस्थ स्वतंत्रतेचे पक्षाचे होते, त्यांचींही घरे जाळलीं, व तो दंगा नाटिं- गम शहरांतून पुढे कांहीं शिपाई येईपर्यंत बंद झाला ना- हीं. त्या दंगा करणारांतून बहुतांस धरून चौकशी के ली; व तिघांस फांशीं दिलें. पार्लमेंट सभा संन् १७९२ चे जानुआरी महिन्याचे ३१ वे तारिखेपर्यंत मिळाली नाही. राजाने आपला मुलगा व प्रशिया देशची राजकन्या फेडेरिका या दो- घांशी लग्न झालें, असें कळविले; सांगितले की, आपण व आपले स्नेही राजे यांनीं मध्यस्थी करून जर्मनी दे शचा एंपरर, व तुर्कस्थान यांमध्यें तह झाला; आणि तुर्कस्थान व रशिया या दोहोंमध्यें तहाची पहिली कलमें ठरत आहेत. यांविषयीं सभेमध्यें बहुत वाद झाले; परंतु शेवटीं त्यांसंबंधी बोलणीं अनेक संमति पडून सिद्धीस गे- लीं. पिट साहेबानें सभेपुढे सरकारी खर्चाचे हिसाब आणून दाखविले, त्यावरून प्राप्तीपेक्षां खर्च फार कमी असे कळू आले, तेव्हां पिट साहेबाने सांगितले की, सरकारी करांतून प्रतिवर्षी २००००० पौंड कर बंद करावे, आणि पार्लमेंट सभेनें प्रतिवर्षी दहा लक्ष पौंड कर्जाचे फडशाकडे लावण्याचा हुकूम केला आहे, त्याखेरीज दु- सरे ४००००० पौंड तिकडे लावावे. आतां रोकड