पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटावयाकरितां त्याने संन् १७९१ त आपण, राणी, आ- पली बहीण, मुलगा, आणि मुलगी यांस बरोबर घेऊन जाण्याचा यत्न केला. तो राज्याच्या शेवटी पोचला होता, इतक्यांत त्यास धरून पुनः पारीस शहरास नेले. परंतु त्या वेळेस प्रजापक्षाचे लोकांमध्ये शांतपणा इतका होता की, त्यांनी त्यानंतर कांही दांडगाईचें कर्म केले नाहीं. नेश- नल आसेंव्ली या सभेने नवी राज्यरीति पुरी केली, ती राजाने त्या वर्षीचे सप्तंबर महिन्यांत मान्य केली; आणि पुढे त्या सभेनें निरोप घेऊन नवी झाली, परंतु तीमध्ये जुने सभासदांतून कोणाची नेमणूक केली नाहीं. यामुळे फ्रान्स देशाची पुढे इतकी विपत्ति झाली. या फेरफाराविषयी इंग्लंड देशांमध्ये लोकांची मते वेगवेगळीं होतीं; व यांविषयों अनेक लहान लहान ग्रंथ व त्यांची उत्तरें प्रसिद्ध झालीं. संन् १७९० मध्ये फेर- फार झाला होता, त्या दिवसाचे स्मरणाकरितां लोकांनी सभा केल्या, त्यांमध्ये राज्य रीतीविषयीं ज्यांची मतें विप- रीत होतीं, तेही गेले होते. पुनः संन् १७९१ त, १७- ८९ चे जुलै महिन्याचे १४ वे तारिखेस उत्साह झाला, तेव्हां सर्वसत्ताक राज्य करण्याचा ज्यांचा बेत दिसत होता, त्यांचा सूड उगविण्याचा लोकांनी निश्चय केला. लंडन शहरामध्ये मंडळी बहुत मिळाली होती, परंतु मा. जिस्लेट यांचे बंदोबस्तामुळे तो दिवस निर्भयपणानें नि- भावला. बर्मिंगम शहरांत मंडळी थोडी मिळाली होती; परंतु दांडगाई फार झाली. दोन प्रहरांनंतर लोक उठले, त्यांनी लोक मिळाले होते, त्यांस पळविले; आणि पुढे ज्यां- चा लोकांस कंटाळा आला होता, आणि जे तेथे नव्हते,