पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांचा वेढा पडला, आणि जरूर पडल्यास जबरीनें तें शहर शांत राखावें असा वेत होता. असे असतां प्रजां- च्या पक्षाचा प्रधान नेकर साहेब यास संन् १७८९ चे जुलै महिन्यामध्यें जागेवरून दूर केले, तेव्हां पारीस श रामध्ये एक भयंकर बंड झालें, लढाऊ लोक प्रजांवर गोळी घालीनात; बास्तिल ह्मणून एक वंदिखाना पारीस शहरचे लोकांस फार दिवस भयकारक झाला होता, तो लोकांनीं वेढिला, आणि घेतला; तेथील गवरनर व दुसरे कित्येक द्वेष्टे लोक यांचा शिरच्छेद करून त्यांची डोकीं मोठ्या उत्साहानें काठीवरून नेलीं; सारांश, स्टेट्सजन- रल सभा एकत्र मिळाल्यानंतर दोन महिन्यांत राज्याचा फेरफार झाला, त्यापासून सर्व युरोप देशास आश्चर्य वा टले. जुलै महिन्याचे १७ वे तारिखेस राजा पारोस शह- रांतील होटेलडिविल या वाड्यांत गेला, आणि लोकांचे स्वाधीन झाला. तेव्हांपासून त्याची राजा ह्मणून सत्ता होती ती सर्व गेली. नंतर नेशनल आसेंब्ली या सभेचा विजय झाला, ह्मणून त्यांनीं मोठे लोक व मोठे' लोकांची जमी- नीवर सत्ता असावी, हे सर्व मोडिलें. धर्मपक्ष्यांच्या जिनग्या जप्त करून त्यांनी इतर सरकार चाकरांसारिखें सरकार देईल ते घेऊन रहावें असे केले, आणि सर्व महंतांची सं- स्यानें बंद केलीं. अक्टोबर महिन्यांत वर्सेल शहरांत दुसरा एक दंगा केला; ह्मणून राजा, त्याचे कुटुंब, व नेश- नल आसेंब्ली हीं पारीस शहरास निघून आली. वास्त- विक राजा आतां कैदे ता; कारण की, त्याचा राजा- परंतु तो काय करितो याची प्रमाणें मान राखीत असत, फार चौकशी होत असे. या दुःखदायक स्थितीपासून .