पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यापासून रशिया देशचे सरकाराचा सार्थ झाला. ही पार्लमेंट सभेची बैठक जून महिन्याचे १० वे तारिखेस बंद झाली. पूर्वी लिहिले कीं, संन् १७८९ मध्ये फ्रान्स देशांत एक फेरफार झाला. तो अशे रीतीचा की, त्यापासून राज्याची, धर्माची, आणि लोकांची जुनी रीति अगदीं मो- डली. फ्रेंच राज्यांतील खर्चाची व्यवस्था अमेरिका खंडा- तील लढाईमुळे फार कठीण झाली होती. त्या लढाईमुळे फ्रेंच दरवाराचा गर्व शांत झाला, परंतु सामर्थ्य कमी झाले; ह्मणून तेथील राजानें राज्यांतील मुख्य लोकांची सभा केली; आणि तीपासून चांगला कारभार चालेना, ह्मणून दुसरी एक स्टेट्सजनरल या नांवाची मोठी केली. ती लुईस राजा १३ वा संन् १६१४ तेव्हांपासून झाली नव्हती. तीमध्ये तीन प्रकारचे लोक होते. पहिले, मोठेलोक दुसरे धर्मपक्षी, आणि तिसरे साधारण लोक. हे तिसरे लोक पहिले दोन प्रकारचे लोकांचे एकंदर संख्येपेक्षां दुप्पट होते; आणि जेव्हांती मोठी सभा वर्सेल शहरांत एकी- कडे जमली; तेव्हां विचार पडला की, तिघांनीं तीन वेग- वेगळे घरीं बसावें, किंवा सर्वांनी मिळून एके घरांत बसावें. साधारण लोकांनी शेवटचा पक्ष मोठे आग्रहाने धरिला. मग त्यांनी नेशनल आसेंब्ली असा आपणास किताब ठेवून सांगितले कीं, दुसरे दोन प्रकारचे लोक जर आजून आग्रह धरितील, तर आह्मी काम चालवावयास मुख्तयार आहो. पुढे मोठे लोक, व धर्मपक्षी, यांस ती गोष्ट कबूल करणे जरूर पडली; आणि त्या सर्वांची सभा एके वाड्यांत झाली. तितक्यांत पारीस शहरावर पत्रास हजार माण-