पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ लणे बोलून पूर्वी जसा शेरिडन साहेबाचा स्नेह तोडला होता, तसा फाक्स साहेबाचाही तोडला. त्या फाक्स साहेबाचें व त्याचें पार्लमेंट सभेत मुळापासून एकमत होतें, ह्मणून अकस्मात् स्नेह तुटल्यामुळे फाक्स साहेबाचे डोळ्यांत आश्रुपात येऊन तो शांततेने व स्नेहाने बोलू लागला, परंतु बर्क साहेबानें त्याचा तिरस्कार केला; आ- णि तेव्हांपासून त्या दोघांचा स्नेह पुनः कधी झाला नाहीं. ही सभेची बैठक संपावयाचे पूर्वी पुनः रशिया देशाशीं लढाई होईल असे भय पडलें. हंगारी देशचा राजा लि. ओपोल्ड राज्य करूं लागला, तेव्हां संन् १७९० चे आगष्ट महिन्यांत त्यानें ब्रिटिश सरकारचे मदतीनें तुर्क- स्थानाचे दरवाराशीं तह केला. आतां ब्रिटिश सरका- राने रशिया देशचे राणीस निरोप पाठविला की, तुर्क- आणि रशिया यांमध्ये पुनः तह व्हावा, अशी आमची इच्छा आहे. त्या राणीनें तिरस्कार करून ही मध्यस्थी कवूल केली नाहीं; आणि राजानें कामन्स सभेस निरोप पाठविला की, मी व माझे स्नेही दूसरे राजे यांनी मिळून तह होण्याचा यत्न केला, परंतु तो सिद्धीस गेला नाहीं, ह्मणून आपले अरमार कांहीं वाढवावे, हे मला जरूर दिसतें. या निरोपाचा विचार होऊं लागला, तेव्हां रशियन मुलु- खाशीं लढाईविषयीं सभेमध्यें व बाहेर लोकांचे बोलणे इतके विपरीत पडले की, राजाचा निरोप आल्यामुळे पिट साहेबाचे ह्मणणें तर कबूल झाले खरें, परंतु त्यानें योजि लेला बेत सोडून दिला. व पुढे ब्रिटिश सरकारानें आ णखी कांहीं मध्यस्थी केल्यावांचून रशिया व तुर्कस्थान यांमध्ये आगस्ट महिन्यांत तह झाला; परंतु तो असा की, २२