पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ अधिक संमति पडून ते रद्द झाले. दुसरा एक कायदा ठरला कीं, आफ्रिका खंडाचे पूर्वेचेकांठावर सिएरालिन या नांवाचा प्रांत आहे, तेथें वेस्टइंडीस देशचे व दुसरे उष्णदेशचे जिन्नस स्वतंत्र निग्रो लोकांकडून काम घेऊन उत्पन्न करावे, अशी सनद एके मंडळीस द्यावी. या मंड- ळीचे कामास बहुत वि झाली; परंतु जसजसा तिचा यत्न सिद्धीस जाईल, तसतसी तीपासून वेस्टइंडीस देशचे संस्था- नाची दुर्दशा होईल. या पार्लमेंट सभेत मोठी गोष्ट ही ठरली कौं, क्यानडा प्रांतांत नवी राज्यरीति स्थापावी; त्या प्रांताचे अपर क्या- नडा, व लोअर क्यानडा, या नांवाचे दोन विभाग करावे, प्रतिराज्यांत राजानें नेमिलेले एक कौन्सिल आणि लो- कांनी नेमलेल्या सभा असाव्या; त्यांमध्ये हेवियस कार्यस कायदा मुख्य असावा. तेथील व्यापार चालावयास जि- तकी गरज लागेल यावांचून दुसरे कर पार्लमेंट सभेने बसवूं नये, व त्या करांचा वसूल तेथील प्रांताचे राज्य कर णारांचे स्वाधीन असावा. या वेतापासून सर्व लोकांस संतोष यांवर फाक्स साहेबानें कांहीं विपरीत भाषण केले कीं, कौन्सिल यांत सात वर्षांनी एक वेळ नेमणुकी करूं नये; परंतु प्रतिवर्षी एक वेळ, किंवा तीन वर्षांनी एक वेळ कराव्या, आणि कित्येक पदवीचे लोकांस जन्म- पर्यंत कौन्सिल यांत बसण्याचा अख्तयार देण्याची सत्ता सरकारानें आपणाजवळ ठेविली, हें ठीक नाहीं. या भाष- णावरून फ्रान्स देशामध्यें वंशपरंपरेचे किताब व प्रतिष्ठा हीं बुडाल्याची काही गोष्ट निघाली; तेव्हां वर्क साहेब उठला, आणि त्यानें फाक्स साहेबाशीं कांहीं रागाचें बो- झाला.