पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ पुढे शेव- पृथ्वीवर जितके पुरुष आहेत तितक्यांच्या सांगण्यानेंही, मी माझे मनांत आलेले कधीं मोडणार नाहीं. टपर्यंत जें जे दुःख झाले, ते ते त्यानें अशे रीतीचे धैर्यानें सोसलें. त्यामुळे बहुत लोकांनी त्याचे धीराची तशीच त्याचे कर्माची स्तुति केली. राजास मंत्री, आणि पार्लमेंट हीं दोन्ही नाहींशी झाल्यावर, त्याने प्रथम जी मसलत केली, ती चांगलीच केली. ती ही कीं, फ्रान्स आणि स्पेन या दोन इ०स० १६२९ राज्यांशीं जी निरर्थक लढाई आरंभिली होती आणि जीपासून कांहीं फळ झालें नाहीं, ती बंद करून त्यांशी तह केला. या रीतीनें त्या गडबडींतून सुटल्यावर, राजा राज्यांत बंदो बस्त राखावयाविषयी उद्योग करूं लागला. त्यानें आप- ल्यास मदत करणारे, परंतु आपले आनेंतले असे दोघे पुरुष घेतले. त्यांची नांवें सर टामस वेत्वर्थ (जो पुढे स्त्राफर्ड याचा अर्ल झाला होता) आणि लाड ज्यास पुढे क्यांतर्बरी एथील आर्चेबिशप याचें स्थानावर नेमिला होता. लाड याने धर्मसंबंधी कामकाजाचा बंदोबस्त राखिला होता; आणि राजा व अर्ल, स्त्राफर्ड हे राज्य- कारभार करीत असत. मग लवकरच एक अशी खबर जाहीर केली की, त्या राज्यांत पुढे पार्लमेंट यांच्या सभा होणार नाहींत. 4. टानेज आणि पौंडेज या नांवाचे करराजाच्या हुकुमाव- रूनच लोकांवर बसविले; जकादीवरचे कामगारांस अमा- त्यांच्या सभेतून हुकूम गेले कीं, कोणाचे घरांत जकात न दिलेला माल आहे, असे समजले ह्मणजे त्याचे घरांत जाऊन शिरावें. पोप याचे मताचे लोकांशी करार केले, आणि