पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास नाहींसा होईल, असे समजून हा वेत चालूं दिला नाहीं; ह्मणून तो साहेब वर लिहिलेले करारानें उसनवार पैका घेण्यास मान्य झाला. यापासून एक चमत्कारीक गोष्ट घडली. बांक याचे कामगारांस दावा न केलेले भागांच्या यादी व त्यांवर दावा करणारांची नांवें छापून प्रसिद्ध करणें जरूर पडलें; त्यामुळे बहुतांचे वडिलांचा बांक या बरोबर हिसाब चुकविते वेळेस दुर्लक्ष्याने किंवा विसरून जो पैका राहिला होता, तो त्यांनी परत घेतला. पार्लमेंट सभा एकत्र जमल्यावर हस्तिग्झ साहेबावर आरोप ठेवण्याचे कामांतला मुख्य वर्क साहेब यानें तो मोठी चौकशी पुनः करावी, ह्मणून बोलणे आरंभिलें. तेव्हां असा विचार पडला कीं, पार्लमेंट सभेस निरोप होऊन दुसरी सभा झाल्यावर पहिलो अन्यायाची चौकशी संपली असे होते किंवा नाहीं. याविषयीं बहुत तंटा व वाद हो- ऊन शेवटीं नाहीं असे ठरलें. परंतु या सभेचे बैठकींत ती चौकशी पुनः चालू झाली नाहीं. संन् १७९१ चे प्रारंभी कांहीं थोडी हरकत होऊन एक कायदा ठरला कीं, इंग्लिश रोमन क्याथोलिक यांनीं पोष याचे सत्तेचे विरुद्ध प्रतिज्ञेवर सही केली, ह्मणजे त्यांस पूर्वी कित्येक अधिकार नव्हते, ते मिळतील. ती प्रतिज्ञा अशे शब्दांनी लिहिली होती की, त्या धर्माचे पक्षाचे उदार लोक होते, त्यांच्यानें तीवर हरकत करवेना; परंतु तीपासून इतके झाले कीं, तीवर ज्यांनी सही केली, आणि ज्यांनी केली नाहीं, त्यांमध्ये भेद पडला. एमिल महिन्यामध्ये विल्वे फोर्स साहेबानें गुलामाचा व्यापार बंद करण्यासाठी बोलणे चालविलें, परंतु त्यावर पंचाहत्तर