पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रथम कबूल करावें. पुढे बोलणे झाले त्यांत इमारती व गलबतें परत द्यावीं. आणि ब्रिटिश लोकांचा जो तोटा झाला तो भरून द्यावा असे ठरले; आणि गलबतें पाठविणें, व माशांचा व्यापार, हे हक कांहीं एक नियमाप्रमाणें दो- नही राज्यांतील प्रजांनीं भोगावे असे झाले. या तहाचा शेवटचा ठराव नवे पार्लमेंट सभेत झाला. जुने पार्लमेंट सभेस जून महिन्यांत निरोप झाला. नवें पार्लमेंट याची सभा नवेंबर महिन्याचे २५ वे तारिखेस वसली. सभेचे प्रारंभी राजानें भाषण केले, त्यांत कळविलें कीं, स्पेन देशचे सरकाराशी तह होऊन तंटा बंद झाला ह्मणून मला मोठा संतोष झाला. आणि रशि- या व तुर्कस्थान यांमध्ये जरी आजून लढाई चालली आहे, तरी आस्त्रिया देशचे सरकारानें रशिया देशचे सरका- राशीं तह केला, आणि रशिया देशचे सरकाराने स्वीडन देशचे सरकाराशी केला. स्पेन देशाशी तहाचा करार केला होता, तो दोनही पार्लमेंट सभांस मान्य झाला. नंतर सरकारी खर्च अधिक न वाढतां या अरमाराच्या खर्चा, बद्दल पैका उत्पन्न होण्यासाठी पिट साहेबानें बेत केला की, कांही दिवसांचे मुदतीनें कित्येक नवे कर बसवावे, ह्मणजे त्या कर्जाचा फडशा चार वर्षांत होईल; आणि बांक यातून पांच लाख पौंड व्याजावांचून उसनवार घ्यावे. या उदार करारांचे कारण हे होते की, बांक यामध्ये कोणी दावा न केलेला पैका सहा लक्ष आठ हजार पौंड आहे, त्यांतून पांच लाख उसनवार घ्यावे, असा पिट साहेबाचा प्रथम बेत होता; परंतु असें केलें असतां लो- कांनी ज्याजवळ पैका ठेविला होता, त्यावरचा त्यांचा वि