पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कीं, कामन्स सर्भेत नवे दुसरे शंभर लोक अधिक असावे, व ते नेमण्याचा अधिकार सर्व प्रांतांतील राहणारे नवे ब- हुत घरवाले लोकांस असावा. त्याचें दुसरें ह्मणणें होतें कीं, शेरीफ व त्याचे डेप्पुटी यांनी त्या दिवशीं प्रति पा- रीश * यांत राहाणारे घरवाल्यांच्या संमति घ्याव्या. पूर्वी सांगितले त्यावांचून या सभेत दुसरे राज्यांतील वहिवाटीसंबंधी काम फार झाले नाही. परंतु इंग्लिश सर- कार व स्पेन देशचें सरकार या दोघांमध्ये एक तंटा झा ला. त्यावरून शेवटीं लढाई होईल असें भय पडले. संन् १७८६ मध्ये कित्येक ब्रिटिश व्यापाऱ्यांनी चिनई लो- कांस चांमडी पुरवावयासाठीं नूटकासौंड या बंदरीं व्या- पार चालवावयाचा बेत आरंभिला. संन् १७८८ या वर्षी त्यांनी आपलें तें संस्थान टिकावयाजोगें जमविलें; परंतु त्या अपहारामुळे स्पानियार्ड लोकांस राग येऊन संन् १७८९ चे मे महिन्यामध्ये त्यांचे एके गलवतानें इंग्लिश यांची दोन गलबतें कैद केली, आणि त्यांनी सं स्थान केले होतें तें घेतले. जेव्हां ही गोष्ट कामन्स सभेत आली, तेव्हां प्रधानास आज्ञा झाली की, तिचा स्पा- निश दरबारांतून बंदोबस्त व्हावयाजोगी तजवीज करावी. तेव्हां सुमारे तीस लाख पौंड खर्चून एक अरमार तयार केलें. हें अरमार मोठें भयंकर दिसले त्यामुळे, किंवा तहाचा उपाय करण्याची स्पेन देशचे दरवारास इच्छा होती, त्यामुळे असे ठरले की, ब्रिटिश वकिलानें जी खा- तरी व तोटा भरून देण्याविषयी बोलणे लावि तें आहे,

  • एके धर्मपथ्याचे अमलाखालीं जितका प्रांत असतो, त्याचें नांव

पारीश.