पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

की, या घटिकेपासून तुमचा आमचा राज्यकारणी स्नेह तुटला. प्रधान बर्क साहेबाचे मतास आश्रय देत असत; परंतु त्याचे बोलण्याचा कठोरपणा त्यांस मान्य नव्हता. या कज्जापासून पुढे विरुद्ध पक्षांत फूट पडली, व वाढत जाऊन तीपासून देशाचे स्वस्थतेत अंतर पडावयाजोग्या गोष्टी बहुत घडल्या. टेस्ट व कार्परेशन हे कायदे मोडण्याविषयीं दोन यत्न झाले, ह्मणून पूर्वी सांगितले. त्यांतून शेवटचे वेळेस अशी आशा आली होती की, पुनः यत्न केला असतां सिद्धीस जाईल. परंतु डिसेंटर लोकांस फ्रेंच राज्यांत फेरफार झाला, व त्यापुढें जीं कृयें झाली, त्यांची मोठी आवड आहे हे प्रसिद्ध होते; ह्मणून धर्मपक्षी व दरबारी लोक यांस भय पडलें. पुढे जेव्हां ते कायदे मोडण्याविषयी पुनः बोलणें निघाले, तेव्हां बर्क साहेबाने डिसेंटर लोकांचे मनांतील गोष्टी सभेस सांगितल्या, त्या तेथें सभासद होते, त्यांचे मनांत बऱ्याच भरल्या; ते कायदे न मोडण्याविषयीं प्रधा- नांनी अशा युक्ति सांगितल्या, व कांहीं नवे गोष्टीचें त्या वेळेस इतकें भय होतें कीं, अधिक संमतें पडून ते कायदे मोडूं नये असे ठरलें. ते समयी सुमारे ४०० सभासदांनी आपली संमतें दिली. तेव्हां फ्लड साहेबाने पार्लमेंट सभेचे रीतीत कांहीं फेर- फार करण्याचा बेत सभेत आणिला होता; परंतु नव्या गोष्टीस लोक भितात, व फ्रान्स देशांत राज्यरीतीमध्यें कशीं कशीं संकटें उत्पन्न झाली, हे उघड आहे, ह्मणूने तो बैत मतभेद न पडतां रद्द होईल, असे समजून फ्लड साहे बानें तो सभेतून काढला, त्या बेताचा सारांश असा