पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ कबूल केली, तेव्हां त्यांनी हेनरी आडिंगतन साहेबाची नेमणूक केली; त्याची वर्तणूक धीराची होती, आणि तो पक्षपात सोडून निवाडा करीत असे, ह्मणून सर्व पक्षाचे लोकांची त्यावर प्रीति वसली. या वर्षी फ्रान्स देशामध्ये एक मोठा फेरफार झाला. त्याचा संक्षेपानें वृत्तांत असा आहे की, फ्रेंच लोकांचे खर्चाची व्यवस्था फार कठीण होत चालली, उदार कल्प- ना वाढत चालल्या, भाषण स्वतंत्र होत चाललें, स्वतंत्र- तेचे इच्छिणारे फ्रान्स देशामध्ये होते, त्यांची व इंग्लंड देशांतील तशा पुरुषांची कागदपत्रे होऊं लागलीं, दरवार अशक्त झालें, आणि फौज लोकांचे पक्षाकडे येऊ लागली या सर्व कारणांमुळे सर्व राज्य, जुनी राज्यरीति, राजा, मोठे लोक, पार्लमेंट सभा, न्यायाच्या अदालती, आणि हक, ही एकदांच नाश पावलीं. पुढे लोकांवर ज्यांनी आपला हुकूम चालू केला, त्यांनी जर शहाणपणानें आणि शांततेनें सावधगिरीची वर्तणूक केली असती, तर बरें होतें; परंतु ते मर्यादा न ठेवितां सर्वत्र जुलूम करूं लागले; आणि त्यांनी चांगला स्वतंत्रपणा स्थिर करण्याचे सोडून, जे आपल्या स्वाधीन झाले यांवर जुलूम आरंभिले. हा फ्रेंच राज्यांत फेरफार संन् १७८९ त झाला; आणि पुढे १७९० त जेव्हां पार्लमेंट सभा जमली तेव्हां सहज त्या गोष्टीविषयी बोलणे होऊ लागले. या लहानशे गोष्टीपासून मोठ्या गोष्टी घडल्या. त्या प्रसंगी बर्क साहेबानें फ्रान्स देशांतील कामगारांची फार निंदा केली. त्यावर विरुद्ध पक्षामध्ये त्याचे सोबती फाक्स साहेब व शेरिडन साहेब यांनीं उत्तर दिले. यांतून दुसरे गृहस्थांस बर्क साहेबानें लटलैं जे