पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खी नव्हती, ह्मणून त्याचा लोकांस फार त्रास आला होता; आणि तो बंद होण्यासाठी बहुत वेळ यत्न केला असतांही तो सिद्धीस गेला नव्हता. शेवटीं फावस साहेबानें सां- गितल्यावरून कामन्स सभेनें त्याविषयी लोकांची प्रार्थना ऐकिली. पूर्वी टेस्ट व कार्परेशन हे कायदे मोडण्या- विषयीं डिसेंटर लोकांनी अर्जी केली, ती अधिक संमतें पडून रद्द झाली होती; परंतु पुनः केली असतां चालेल अशी आशा होती, ह्मणून त्याविषयीं बोलणें निघाले; तेव्हां अधिक विरुद्ध संमतें वावीस मात्र पडली. यावरून पुनः आशा आली; परंतु ती पुढे फुकट गेली. माचा व्यापार बंद होण्याकरितां बहुत यत्न झाला. केवळ सिद्धीस गेला नाहीं, तथापि त्यास जे विरुद्ध लोक होते, ते पहिल्यापेक्षा थोडे झाले. त्या व्यापारांत ज्या लो- कांचा संबंध होता त्या सर्वांस भय पडले, आणि त्यांस अर्ज्या कामन्स समेत बहुत येऊं लागल्या. या वर्षी गुला तो या वर्षी तंबाकूचे व्यापारांत एक्सैस कायदा चालू झाला. पूर्वी बहुत वर्षांपासून त्या व्यापारांत लवाड्या उघड होत असत; परंतु एक्सेस कायदा त्या व्यापारावर लागू करणे, हे लोकांस चांगले वाटेना. ह्मणून त्या कामांत प्रधानास सभेमध्यें व सभेचे बाहेर बहुत वि आली; तथा पि तें दोनही सभांत सिद्धीस गेले. पूर्वी सर राबर्ट वाल पोल याचे अमलांत अशे जातीचे एके कायद्यास इतका प्रतिबंध झाला की, त्यामुळे तो लवकर पदच्युत झाला. या वर्षी कामन्स सभेचा स्पीकर, कान्वाल साहेब मेला, ह्मणून त्या मोठे जागेवर ग्रेन्विल साहेबाची नेमणूक झाली; आणि त्यानें सरकारचा सेकतारी याची जागा