पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाले असते; परंतु तो कायदा ठरावयाचे वेळेस दैववशात् राजा दुखण्यांतून बरा झाला अशी वातमी आली. मग राजा चांगला बरा होऊन मार्च महिन्याचे प्रारंभी राज्य- कारभार पाहू लागला. त्या महिन्याचे १० तारिखेस लार्ड चान्सेलर यानें चालीप्रमाणे भाषण करून पार्लमेंट सभेचें काम चालू केलें. हें शुभवर्तमान चांगलेच देशांत सर्व ठिकाणी कळलें. चहूकडून आनंदपत्रे येऊं लागली; लंडन व वेस्तमिन्स्तर या शहरांत दिवे लावून मोठी शोभा केली. एप्रिल महिन्याचे २३वे तारिखेस सर्व राज्यांत लोकांनी ईश्वराचा स्तव करावा असे योजिलें. त्या दिवशीं राजा दुखण्यांतून निभावला ह्मणून ईश्वराची स्तुति कर ण्याकरितां आपले सर्व कुटुंव, व दोन सहित सेंटपाल याचे देवळांत गेला. सभा यां- दुसरे रा त्रीस दिव्यांची फारच शोभा झाली, तिचें वर्णन करून ती समजणार नाहीं. गरीब आणि मातवर दोघेही ती शोभा अधिक अधिक करूं लागले. अयर्लंड बेटांत इंग्लंड देशाप्रमाणेच राजाचे दुख- ण्यांत राज्यकारभार चालण्याविषयींचे कायदे करावयाचा यत्न झाला. तेथील पार्लमेंट सभेत ठरले की, राजपुत्राचे सत्तेस कोणताही प्रतिबंध नसावा. ही सत्ता प्रिन्स यास देण्याचे कामाकरितां साहा असामी नेमिले; परंतु ते येऊन पोचण्याचे पूर्वीच राजा दुखण्यांतून बरा झाला. पार्लमेंट सभा जमल्यावर प्रथम लोकांचें लक्ष्य दुका- नावरचा कर बंद करण्याचे कामाकडे लागले. तो थोडे वर्षांपूर्वी पिट साहेबाने बसविला होता. त्यापासून जुलूम होत नव्हता, तथापि तो बसविण्याची रीति सर्वांवर सारि