पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ त्यामुळे पार्लमेंट सभेत पुढे राजा कोण व्हावा, याचा वि- चार करणें प्राप्त झाले. त्यांत एक गोष्ट कठीण घडली, ती ही कीं, प्रधान व विरुद्ध पक्षाचे लोक यांमध्ये भेद पडून विचार उत्पन्न झाला कीं, प्रिन्स आफ वेल्स, रा- जाचा मुलगा यास राजा दुखणेकरी आहे तंवपर्यंत सर्व राज्याचा अखत्यार देऊन कारभार चालवावयास नेमावें. किंवा जी सत्ता आणि जे हक्क राजा जीवंत असतां यावां- चून दुसरे कोणास उपभोग करण्याचे सामर्थ्य नाहीं, ते त्याचे हातीं नसून त्यानें सुलुखाचा दुसरा कारभार चाल- प्रधानांचे ह्मणणें होतें कीं, वावा, असा बंदोबस्त करावा. राजपुत्राची सत्ता नियामत असावी. राजाचा घरगुती कारभार राणीचे स्वाधीन करावा, तिला मसलत सांगणारे प्रधान नेमावे, आणि राणी व तिचे प्रधान यांस राजाची प्रकृति वरी झाली, असे वाटलें ह्मणजे राजानें आपला अ- धिकार घ्यावा, आणि राजपुत्राने कारभार सोडावा. हा प्र- धानाचा बेत पार्लमेंट सभेतील दुसरे पक्षाचे लोकांस फार विरुद्ध झाला. त्या वेळेस प्रधान आपली कामें सोडणार होते, आणि नवे प्रधानांत विरुद्ध पक्षाचे लोकांची नेमणूक होणार असे दिसत होतें, तथापि सर्व लोकांचा पिट साहेवावर फार भरंवसा होता, ते त्यास स्तुतिपत्रे देत असत, व पार्लमेंट सभेतही त्याचे पक्षाच्या संमति फार पडत; आणि जर रा जपुत्रानें कारभार करावा असे ठरले असते, तर फार अड- चण राहिली नसती. त्या वेळेस नियमित सत्ता देऊन राजपुत्रास कारभार चालवावयास नेमिलें असतें, तर सरकारचें वजन कमी