पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ त्यांचे मा सभेचे कारकून, मग चान्सरी याचे मास्तर, मग सर्जंट या नांवाचे कामगार, आणि मग न्यायाधीश. गून एक चोपदार, पियर यांचे वडील मुलगे, मग लहान वयाचे पियर, मग अशर ह्मणून कामगार, वारन, विशप, वैकौंट, अर्ल, मार्कइस, डयुक, अर्चविशप आणि मग लार्ड चान्सेलर. त्या समारंभांत सर्वांचे शेवटीं राजाचे कुटुंबांतली मनुष्ये आली. त्यांत प्रथम ड्युक ग्लास्तर याचा मुलगा आणि शेवटी ग्रिन्स आफ वेल्स. जागेवर जाते वेळेस त्यांनी आपल्या टोप्या काढून तक्तास सलाम केला. चालीप्रमाणे कृति झाल्यावर कोर्ट याचे कारकुनानीं आरोप वाचून चौकशी चालू झाली; आणि मध्ये कांही दिवसांचे अवकाशानें तो तीन महिनेपर्यंत चा- लली. आपले या बैठकीचे शेवटीं आफ्रिका देशांतून वेस्टइंडीस प्रांतांत गुलाम पाठविण्याचा चांगला बंदोबस्त करण्याविष यीं एक कायदा झाला. हे लिहिण्याचे कारण की, गु- लामाचा क्रूर व्यापार बंद करण्याविषयीं हा पहिला यत्न. त्या वेळेस ब्रिटन देशामध्ये सर्वत्र स्वास्थ्य होतें. युरोप खंडांतील इतर देशांत लढाया आणि तंटे चालले होते. ज्या राजनीतीपासून अशा गोष्टी झाल्या, तिचा उपकार मानून, सन १६६८ मध्ये राज्यांत फेरफार होऊन तृतीय विलियम राजा आला, त्या दिवसाचे स्मरण राहण्यासाठी, सर्व ठिकाणचे लोक त्या दिवशीं आनंद करीत असत. लोक या रीतीनें आपले सुखाचे स्थितीचा अनुभव घेत असतां, अकस्मात एक गोष्ट घडून त्यांस दुःख झालें. तें असे कीं, अकटोबर महिन्याचे शेवटीं राजास दुखणे लागले,