पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ इच्छा आहे, अशी माझी पुरी खातरी केली आहे; आणि त्यानें त्या खर्चाचा बेत आणि बंदोबस्त केला आहे, त्याव- रून त्याचा यत्न सिद्धीस जाईल असे मला खचित वाटतें. या वर्षामध्ये हालंड देशांतील संस्थानांत एक फेरफार झाला. तो प्रथमं एके फ्रेंच टोळीनें उत्पन्न केला; परंतु यामुळे पुढे इंग्लंड व प्रशिया एथील सरकारांस त्या तं- ट्यांत पडणें जरूर पडलें. ड्युक आफ ब्रनस्विक याचे हाताखालची प्रशियन फौज सप्तंबर महिन्याचे तेरावे ता. रिखेस हालंड देशांत गेली; आणि तिनें थोडा परंतु स फल प्रयत्न करून सर्व देशांत स्वस्थता केली. फ्रान्स देशाचे सरकारानें डच लोकांचे पक्षाकडची युद्धाची तयारी करण्याचा आपला वेत जाहीर केला; त्यामुळे त्रि- टिश सरकारानेही एक अरमार तयार केलें; परंतु तें दोनही दरवारांचे संमताने पुढील अकटोबर महिन्यांत केले. इ० स० पुढील पार्लमेंट सभेचे बैठकीत मुख्य काम, हेस्तिग् साहेबाची चौकशी झाली. लार्ड सभेनें नेमिलें १७८८ होते त्याप्रमाणें हेस्तिग्झ साहेबानें आपले उत्तर दिले, आणि कामन्स सभेने त्याजवर प्रत्युत्तर दिलें. फेब्रु- वारी महिन्याचे १३ वे तारिखेस चौकशी व्हावी, असें ने- मिलें. त्या दिवशी अकरा वाजतां कामन्स सभा, व तिचेपुढे अन्याय ठेवणारे कामगार, असे आपले सभागृ- हांतून वेस्तमिन्स्तर वाड्यांत आले; त्या वेळेस त्या प्रसंगात्र- माणे तेथें वसावयाच्या जागा केल्या होत्या. त्या मंडळीचे पुढे बर्क साहेव होता. ते बांकांवर बसल्यानंतर एके अर्धता- सानें लार्ड आपले वाड्यांतून निघाले. प्रथम पार्लमेंट