पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० ह्मणजे आपण त्याचा सूड उगवला असे होईल, ईश्वराची सेवा घडेल, आणि लोकांवर उपकार होतील. असा नि श्चय करून तो एकटा पोर्टस्मथ शहरास चालत गेला, तेथें ड्युक या सभोवती फौज होती, आणि तो गलबतावर चढावयास हुकूम देत होता. तो एके चाकराचे खांद्या- वर टेंकून आपला कर्नल याशी बोलत असतां फेल्टन याने त्याचे पोटांत सुरी भोसकली. ड्युक इतकें मात्र ह्मणाला, “अरे त्या लवाडानें मला ठार मारिलें." असे ह्मणून तो कर्नल याचे पायांजवळ पडला. आणि तत्क्षणी मृत्यु पावला. डयुक यावर वार केला, हे किंवा तो कोणी केला, हे कोणेएकाचे नजरेस आलें नाहीं; आणि सगळे शोध करूं लागले; इतक्यांत एक टोपी सांपडली ती उच लून पहातात, तो आंत एक कागद शिवलेला आहे; त्या कागदांत प्रतिनिधी जो ड्युक यावर आरोप ठेवीत असत, त्या अन्वयें चार पांच ओळी लिहिलेल्या होत्या. त्यावरून असा तर्क केला कीं, ज्याने डयुक यास मारिलें, त्याची ती टोपी असावी. मग ती टोपी कोणाची असा शोध करिता- हेत, इतक्यांत एक बोडका पुरुष दरवाजांतून निर्भयपणे जात होता, तो बोलिला, “मी अरे मी!” त्यास त्या कर्मा- चा मोठा संतोष झाला होता, ह्मणून त्यास ना कबूल जा- ण्याचे प्रयोजन राहिले नाहीं; आणि स्वतः तो बोलिला कीं, ड्युक सर्व देशाचा शत्रु होता, ह्मणून त्याची जी अवस्था झाली ती त्याचे कर्मास योग्य होय. मग त्यास पुसलें कीं, तूं कोणाचे सांगण्यावरून डयुक यास मारिलें ? याने उत्तर केलें कीं, तुह्मी ही चौकशी करून आपणांस उगीच कां श्रम देतां ? माझ्या जे मनांत आले तें मी केले, आणि या