पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० हरकत होऊं नये. या तहावर दोनही सभांत विरुद्ध बोलणी पडलीं, परंतु व्यापारी लोकांच्या मंडळ्या याविष- यीं फार विरुद्ध नव्हत्या. फ्रान्स देशामध्ये लोकांमध्यें हा तह फार वाईट वाटला, कारण कीं, व्यापासून दोनही देशांचे स्वार्थ सारिखे होत नव्हतें. या तहाप्रमाणे पो- युगल, स्पेन, आणि माडिरा एथील शराबेवर जो कर होता तो, फ्रेंच दारूवरचे नवे करापेक्षां एक तृतीयांश कमी केला. या वर्षी सरकारचा वसूलही कांहीं वाढला, त्यावरून सर्वांस संतोष झाला. प्रधानाने त्या वर्षाचीं जमा व खर्च ही चांगले रीतीनें झालीं, असें सभेत सांगितले, परंतु त्याचे शत्रूनी ती गोष्ट खोटी असा पुरावा करण्याचा उ द्योग केला. त्या वेळी एक घोड्यावर चाकर मख्यानें द्यावा, असे फार लोकांचे बोलणें विरुद्ध पडलें असतां, पार्लमेंट सभेत ठरवून घेतले. प्राटेस्तंट डिसेंटर व कार्परेशन आवट या नांवाचे हुकूम फिरवावे; ह्मणून अर्जी केली, परंतु ती अठ्याहत्तर अधिक संमतें पडून रद्द झाली; त्या गोष्टीवरून असे वाटले की, त्याविषयीं फिरून यत्न केला असतां सिद्धीस जाईल. मागले वर्षी राजाचा मुलगा प्रिन्स आफ वेल्स यानें आपले मोठे खर्चास पुरावयाजोगी आपली प्राप्ति नाहीं, असे पाहून, आणि आपण मागितल्यावांचून प्राप्ति कांहीं अधिक वाढावी, अशी त्यास आशा होती, ती व्यर्थ गेल्यावर त्यानें सरकार संबंधी आपली शोभा बंद करावी असा नि- श्चय केला. हा त्याचा उत्तम विचार लोकांस फार चो- त्याविषयीं लोकांमध्ये प्रसिद्ध भाषण होई गला वाटला.