पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहुतकरून लागू झाले, ह्मणून ठरविले की, लार्ड सभेस जाऊन वर्क साहेवानें हेस्तिग्झ साहेबावर मोठे गुन्हे आणि फार वाईट वर्तणूक यांचा आरोप ठेवावा. हा निरोप ला- गलाच कळवून जी कलमें तयार केलीं होतीं, ती लार्ड सभेकडे पाठविलीं. त्याच महिन्याचे २१ वे तारिखेस बर्क साहेबानें गुन्हेगारीचें दुसरें एक कलम आणिलें; हे आणि लार्ड चान्सेलर यास सांगितले की, हेस्तिग्झ सा- हेब कैदेत आहे, आणि सभेचे पुढे येण्यास तयार आहे. मग हेस्तिग्झ साहेबास सभेत आणण्याचा हुकूम केला, आणि कलमें वाचलीं. लार्ड चान्सेलर यानें आपले कडचें कांही बोलावयाचे असल्यास बोलावें, असे त्यास सांगितले. तेव्हां त्यानें सभा वास्तवीक आहे तें करील, असे बोलून आपले आरोपपत्राची एक नकल मागितली, आणि आ पला जबाब करण्यास कांहीं मुदत द्यावी, आणि वकील करण्यास व जामीन देण्यास आज्ञा असावी, अशी प्रार्थना केली, मग त्याचे वीस हजार पौंड ऐवजाचे दोन जा मीन घेतले, आणि ते जामीन समन साहेब आणि सलि- वान साहेब यांतूनही प्रत्येकाचा दहा हजार पौंड ऐवजा- चा जामीन घेतला. आणि लार्ड सभेचे दुसरे बैठकीचे दुसरे दिवशीं त्याचा जबाब घ्यावा, असे नेमिलें. ह्मणून ही चौकशी एकीकडे ठेवून दुसरी मध्ये घड लेली वर्तमानें लिहितों. पार्लमेंट सभेचे प्रारंभों ग्रेटव्रि- टन व फ्रान्स या दोन देशांमध्यें व्यापाराचा तह ठरून वसैल्स शहरांत सह्या झाल्या होत्या, तो तह सभेस जा- हीर केला. त्या तहांतील सारांश हा कीं, दोन देशां- मध्ये लढाईच्या सामानावांचून सर्व जिन्नस जाण्यायेण्यास