पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ चौकशी होऊन त्यावर शेवटीं गुन्हा ठेवावा, असा निश्चय ठरला. ती चौकशी चालविणारा मुख्य एड्मंड बर्क सा- हेब होता. त्याचे व ज्याची चौकशी करावयाची त्याचे गुण आणि कीर्ति यामुळे त्या चौकशीची सर्व लोकांस फार आस्था उत्पन्न झाली. बर्क साहेबास कांहीं कागद पा- हिजे होते, ते त्यास देण्याविषयीं तंटा झाल्यावर शेवटी या गृहस्थानें हेस्तिग्झ साहेबावर एकवीस आरोप ठेविले; आणि दुसऱ्या महिन्यांत फ्रान्सिस साहेबानें नवा एक ठेविला. ते आरोप असे. पहिला, रोहिले यांबरोबर लढाई केली. दुसरा, लार्ड क्लैव यानें मोगल यास कोरा व आलाहाबाद प्रांत दिले होते, त्यांचा वसूल जेव्हां तो राजा आपली रा जधानी दिली एथे गेला, आणि मराठ्यांच्या आश्रयानें रा हिला, तेव्हां त्यांस दिला नाहीं. तिसरा, लढाईकरितां काशीचे राजाकडून बहुत मदत मागितली, आणि त्यानें नाहीं ह्मटले ह्मणून त्यास दंड करून राज्यांतून काढून टा किलें. चवथा, अयोध्येच्या बेगम साहेबास धरून बंदीस ठेविलें, पैका काढण्याकरितां त्यांचे चाकरांस कैद करून पायांत विड्या घातल्या, त्यांचे कुटुंबास विपत्तींत पाडिलें, आणि त्यांकडून बळाने जाहागिरी व संपत्ति ही घेतली. पांचवा, फरकाबादचे राजाची जी अवस्था केली तीसंबं- धी. साहावा, साहाळूचे राजासंबंधी. सातवा, दहावा, अकरावा, आणि बारावा, हेस्तिग्झ साहेबानें कंपनी सर काराकडून कांहीं मोठे कंट्राक्ट ह्मणजे मखते केले होते; व सर अर्थरकूट साहेब यास व आपण कित्येक नवीं कामें कल्पून त्यांवर लोक ठेविले होते त्यांस, पगार फार