पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जास कळवावे. मग ते काम ऐरिश पार्लमेंट सभेकडे सोपवून दिले, तेथे पुरा वाद होऊन सर्व वेत शेवटीं रद्द झाला. पुढील वर्षाचे प्रारंभी पिट साहेबानें राज्य खर्चासंबंधी इ०स० एक कायदा करण्याचा उपक्रम केला. तो त्याचे १७८६ मनांत फार दिवसांपासून होता, आणि राज्यसंबंधी बहुत लोकांनी त्याचा फार विचार केला आहे. तो असा कीं, सरकारी कर्जाचा फडशा करण्याकरितां एक पुंजी उत्पन्न करावी. या कामासाठी कमिशनर यांचे हातीं प्रति तीन महिन्यांत २५०००० पौंड जमा करावे. त्या पैक्याचा चक्रवाढ व्याजानें थोडक्या दिवसांत फार ऐवज होईल; अट्टा- वीस वर्षांत चाळीस लाख पौंड, मुदलावर जाजती व्याज येईल असें योजिलें होतें. हा पैका दुसरे कोणते कामास लावूं नये असे केले होते. या बेतावर उभयपक्षी मोठे चा- तुर्यानें फार वाद झाले, परंतु शेवटीं तो ठरला. या वर्षी एक चमत्कारीक गोष्ट घडली. ती अशी की, सेंटजेम्स वाड्याचे दरवाजांत राजा रथांतून उतरत असतां अर्जी देण्याचे मिषानें तेथें एक निकल्सन या नांवाची बायको होती, तिनें रा. जाचे अंगावर सुरी मारिली. परंतु दैववशात् त्याचे अंगास कांही दुखापत झाली नाहीं. चौकशी केली तंव ती वा- यको वेडी असें कळलें, ह्मणून तिला बेध्लम आस्पितल ए पाठविले. त्या वेळेस लंडन व इतर शहरचे लोकांनी राजास संतोषाची पत्रे पाठविली. ता०२ आगट याच वर्षांत दुसरी एक फार दिवस स्मरण राहावया- जोगी गोष्ट घडली. ती ही की, हेस्तिग्झ साहेबाची