पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ ण्याच्या पूर्वी ज्यांस अधिकार नव्हता, अशे एक लाख लोकांस अधिकार द्यावा, असा कायदा ठरवून घेण्याचा उद्योग आरंभिला. परंतु सभेतील अधिक लोक या बेतास विरुद्ध होते, ह्मणून त्यांनीं तो कायदा सभेत रीतीप्रमाणें येऊं दिला नाहीं. तोफखान्याचा मुख्य ड्युक रिचमंड याने नवे किल्ले बांधण्याकरितां बेत करून सभेत आणिला; त्याविषयीं पूर्वी फार खर्च झाला होता, ह्मणून कांही वेळ - पर्यंत त्याचा विचार होऊन शेवटी स्पीकर याची मात्र एक अधिक संमती पडून तो रद्द झाला. पूर्वीचे लढाईंत ज्या अमेरिकन लोकांनी इंग्लिश यां- चा पक्ष धरिला होता, त्यास सरकारानें कांहीं आश्रय द्यावा हे योग्य होतें. तह झाल्यावर त्यांचे स्थितीविषयीं बहुत वाद झाले होते, आणि त्याची चौकशी करण्याक रितां कमिशनर नेमिले होते. आतां पिट साहेबाने सभेस कळविलें कीं, कमिशनर यांनी ४७१००० पौंड त्या कामास एकंदर द्यावे असे ठरविले. त्याने सांगितलें कीं, यांतून १५०००० पौंड अर्जदारांस लागलेच द्यावे, आ- णि पुढे त्यांचा चरितार्थ होण्याकरितां सोडतीनें पैका उत्पन्न करावा. त्या बैठकीत ग्रेट ब्रिटन आणि अयर्लंड या दोहोंमध्यें व्यापाराची नवी रीति असावी, असा कायदा निघाला. त्यास विरुद्ध अर्ज्या बहुत व्यापाराचे शहरांतील लोकांनी दिल्या. या कायद्यावर दोनही राज्यांतील पार्ल- मेंट सभांत बहुत वाद झाला. इंग्लिश पार्लमेंट सभेत तीन महिनेपर्यंत त्याचा विचार चालला होता. एकवेळ लार्ड सभेत तो रद्द होऊन कामन्स सभेत आला, तेव्हां पिट साहेबाने ठरविलें कीं, आपण जे काय केले ते रा