पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ दोन पक्षांचा मिलाफ करण्याकरितां कित्येक लोकांनी प्र यत्न केले; परंतु ते सिद्धीस गेले नाहींत; ह्मणून २५ मार्च काम नीट चालवण्याकरितां त्या पार्लमेंट सभेस निरोप देऊन दुसरी सभा करावी, असा विचार करून राजाने तसे केलें, इ०स० १७८४ या सांप्रतचे प्रधानाची नेमणूक कायद्याप्रमाणे झाली किंवा नाहीं, आणि लोकांचे मनांत ज्या गोष्टी होत्या, त्या आणि जुने प्रधानाचे पक्षाची जी फजीती झाली, ती वाजवी किंवा नाहीं, हा विचार कसाही असो; परंतु इतकें खरें कीं, नव्या नेमणुकी झाल्या त्यांमुळे जुने प्रधानाचा पक्ष अगदी मोडला. त्या पक्षाचे मुख्य लोक मोठे संपत्तिवान्, वजनदार, अबरूचे, आणि त्यांतून बहुत गुणी, असे होते. त्यांतून सुमारें तिसांची नेमणूक नव्या सभेत झाली नाहीं. पुढे प्रधानाचे पक्षावर बहुत संमतें पडूं लागलीं, व लोकही त्यांचे कृत्यांवर फार भरंवसा ठेवूं लागले. हिंदुस्थान संबंधी कारभाराचें आजूनही अगत्य होतें, ह्मणून पिट साहेबानें तीन कायदे करून पार्लमेंट सभेत नेले. त्यांपासून सरकाराचें व लोकांचे पहिले कायद्यापेक्षा अधिक हित होईल, आणि कंपनी सरकाराचे चाकरांचे वाईट चालीचा बंदोबस्त त्याप्रमाणेंच होईल, असे होते. या कायद्यांस जुने प्रधानांचे मित्रांनीं जितका अटकाव कर बैल तितका केला, परंतु शेवटी ते ठरले. द्यांप्रमाणे कंपनी सरकाराचे कारभाराचे चौकशीकरितां कित्येक चौकशी करणारांची मंडळी बोर्ड आफ कंत्रोल या नांवाची नेमिली, ती त्याप्रमाणे अजून चालत आहे. इरेक्टर व प्रोप्रैक्टर यांचे हक्क तसेच राहिले. हे का- त्या काय .