पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ गले चालतील, तंवपर्यंत त्यांजवळ कामे असावी, आणि पार्लमेंट सभेनें प्रार्थना केल्यावांचून यांस दूर करूं नये. पूर्वीचे प्रधानाचे पक्षाचे लोक, व ज्यांस ईस्ट इंडिया कंपनी यांचे व्यवहाराचे कांहीं अगत्य होतें, त्या सर्वांनी हा वेत मोडण्याचा उद्योग केला, आणि तो सरकारचें व लोकांचे नुकसान करून स्वार्थ साधण्याकरितां योजिला आहे, असे समजून सर्व लोकही त्यास विवें करूं लागले. कामन्स सभेत या वेताचे विरुद्ध लोकांमध्यें मुख्य विलि- यम पिट साहेब होता. कंपनी यांची सनद मोडली जाते, कमिशनर यांजकडे सत्ता फार होते, सरकाराचे सत्तेची आणि लोकांचे स्वतंत्रतेची खरावी होते, हे मुख्य दोष त्या कायद्यावर सभेमध्ये आणि बाहेर लोक ठेवूं ला- गले. तथापि फाक्स साहेबाचा कायदा शेवटी कामन्स सभेस मान्य झाला. लार्ड यांचे सभेमध्ये त्यावर यापेक्षां जबरदस्त दोष दिले. ते हे कीं, व्यापासून रयतेचे मालाची खरावी होते, आणि राज्यांतील तीन मोठ्या सत्तांपेक्षां ही मोठी सत्ता उ त्पन्न होते. मग त्याविषयी फार वाद होऊन शेवटीं तो रद्द झाला. असा प्रधानाचा फार प्रीतीचा वेत रद्द झाल्यावर, तें आणि पार्लमेंट सभेत जे त्यांशीं विरुद्ध लोक होते, त्या- मध्ये, कांहीं वेळपर्यंत तंटा चालला. नंतर नवे प्रधान नेमिले, व त्यामध्ये मुख्य प्रधान आणि एक्स्चेकर याचा चान्सेलर या दोन जाग्यांवर पिट साहेबास नेमिलें. कामन्स सर्भेत याचे मतलब सिद्धीस जाईनात; कारण कीं, तींतील फार लोक जुन्या प्रधानाचे पक्षाचे होते. या परंतु