पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ येईल तोपर्यंत त्यांस बंदींत ठेवावें; आणि पहिल्या दोघांपा- सून हजार हजार पौंड दंड घ्यावा, शेवटच्याकडून पाचशे घ्यावा, आणि जामीन घेऊन सोडून द्यावे. सभासद, आपणास अशीं दुःखें होतात ह्मणून आनंद पावत; आणि लोक त्यांचे धैर्याची स्तुति करीत. पडला. असा कामन्स यांचा आग्रह पाहून राजा संकटांत तशांत त्याचा परम स्नेही ड्युक बकिंगम होता तो मेला, तेणेंकरून त्याचे मनांत फारच दुःख झालें. तो ड्युक मरायाचे कारण असे झालें. रोशेल शहराचा वेढा उठवावा अशी राज्यांत मसलत झाली, ती सिद्धीस न्यावयास अर्ल डेन्बी, ड्युक याचा मेहुणा पाठविला. त्याचे हातून कांहीं न होता तो परत आला. ही अप्रतिष्ठा झाली, ह्मणून बकिंगम यास चीड येऊन तो दुसऱ्यानें हला करावयाकरितां पोर्टस्मौध शहरास गेला, या गृह- स्थाचा सर्वांशीं द्वेष होता, आणि लोक त्यास आपला वैरी संमजत होते, ह्मणून कोणी तरी, त्यास अकस्मात् अपघात करील अशी शंका होती. शेवटीं तसेंच झालें. फेल्टन या नांवाचा कोणी एक संभावित ऐरिश कुळांतला गृहस्थ उयक याचे हाताखाली लेफ्टेनंट याचे कामावर होता; त्यावर जो क्याप्टन होता, तो रे बेटांत मेला; ह्मणून ती जागा फेल्टन यास मिळावी, असे असतां ड्युक यानें ती- वर त्याची नेमणूक केली नाहीं; यामुळे त्रासून त्यानें तो उद्योग सोडिला. हा गृहस्थ विचारी, शूर, आणि उता- वीळ होता; त्यास असे वाटत असे की, सर्वदेश इतकें दुःख भोगितो आहे, हे मी प्रयत्न केला असतां दूर होईल. ह्मणून त्यानें निश्चय केला कीं, ड्युक यांस ठार मारावें, म.व. वा. पोतदार Ep. 1