पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ लागले, आणि त्या दोघांचा पार्लमेंट सभेत मोठा मान होता, ह्मणून प्रधानांचे इच्छेप्रमाणें तह सिद्धीस गेला नाहीं. या रीतीनें मार्कुइस राकिंगम इ०स० याचे हाताखालीं फाक्स साहेवानें जो तह आरं- १७८३ भिला होता, तो त्यानें सिद्धीस नेला; आणि लार्ड नार्थ यास पूर्वी जी अमेरिका देशांतील संस्थाने घेण्याची आशा होती, त्यांची स्वतंत्रता त्यास कबूल करावी लागली. असा तह झाल्यावर, आणि नुकताच राज्यांतील काम- गारांत फेर पडला होता, व एकमत झाले होतें; यामुळे जी गडवड झाली होती ती संपल्यावर, प्रधानांनी एक मोठा विचार करावयास आरंभिला. तो हा की, ईस्ट इंडिया कंपनी यांचे स्वदेशांतील व परदेशांतील कारभा- राचा बंदोबस्त करावा. कंपनी यांच्या व्यापारांत आणि राज्यांत जे दोष होते, ते असे उघड झाले कीं, ते झांक- तां येईनात, किंवा त्यांस कांहीं बयाद सांगता येईना; ह्मणून लबाडीच्या वाटा बंद करण्याकरितां आणि पूर्व देशचे रीतीतील सर्व दोष नीट करण्याकरितां फाक्स साहे- बाने एक वेत योजिला. तो असा कीं, इस्ट इंडिया कं पनी यांचे डरेक्टर व प्रोप्रैइटर यांच्या सर्व व्यापारांसं- बंधी आणि राज्य संबंधी अख्यार काढावा; त्यांचें लीड्न्- हाल गल्लीतले घर, वह्या, व कागद, हीं सर्व घ्यावीं; आ- णि सर्व सत्ता, बंदोबस्त, लढाई व तह करण्याचा अख् त्यार, व त्यांचा सर्व वसूल, हीं सात कमिशनर यांचे सत्तेखाली ठेवावी. ते कमिशनर प्रथम पार्लमेंट सभेनें नेमावे, परंतु मग राजानें नेमावे; आणि ते जंवपर्यंत चां- . म. म. द. था. पोतदार,