पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ अमेरिका देशामध्ये जमिनीवरून व समुद्रांतून कांहीं लहान लढाया झाल्या. त्यांतून कित्येकांत इंग्लिश यांचा मोड झाला, कित्येकांत जय झाला; परंतु शेवटी इंग्लिश लो- कांचा दुसरा सरदार अर्ल कार्नवालिस यानें आपणास अशे संकट स्थळी पडून घेतले की, अमेरिका व फ्रान्स एथील मिळालेल्या फौजा जनरल वाशिंगतन याचे हाताखाली होत्या, त्यांनी त्यास व त्याचे सर्व फौजेस धरून कैद केलें. त्यांवरूनही, त्या देशांत लढाई करून फळ नाहीं, हें प्रधा- नाचे ध्यानांत आलें नाहीं. A हिंदुस्थानांत हैदर अली व मराठे यांनी मिळून इं- ग्लिश यांशी लढाई केली, कर्नल बेली साहेबाचा मोड केला, व सर हेक्टर मन्रो साहेबास पळविले; परंतु सर अयरकूट यानें येऊन फौजेचा सरदारपणा आपण घेऊन शत्रूंचा पराजय केला. • लार्ड कार्नवालिस धरिला गेल्यावर अमेरिका देशां- तील लढाई केवळ जरी बंद झाली नाहीं, तरी ती इ०स० बंद झाल्याप्रमाणेच झाली. लढाईपासून जी १७८२ गोष्ट साध्य करावयाची होती, तिची आशा व्यर्थ असे कळून आले; आणि पुढे ज्या लढाया झाल्या, त्या तेथील संस्थानें स्वाधीन करण्यासाठीं नाहीं; परंतु ब्रिटिश फौजे- ची अवरू राहण्याकरितां झाल्या. अशी लढाईची नि- राशा झाल्यावर लोकांचे मनांत तह व्हावा अंशी इच्छा झाली; परंतु इतके दिवस ज्या प्रधानांनीं मोठे अभिमा- नानें लढाई चालविली होती, त्यांच्या हातानें चांगला तह होईना, ह्मणून नवे प्रधानांची गरज अवश्य लागली. मग जुने प्रधान दूर करून नवे नेमिले. मार्कुइस राकिंगम- २०