पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ कांहीं सूट करून दिली, त्यामुळे दोनही पार्लमेंट सभांस. अर्जी करण्याकरितां सेंट आर्जस फील्ड्स या नांवाचे ठिकांणी दांडगे लोकांची मंडळी जमली, आणि लवकरच फार दांडगाई होऊं लागली. त्यांनी शहरामध्ये किंवा जवळ जीं रोमन क्याथोलिक लोकांची देवळें होती तो मोडलीं, आणि न्यूगेट, प्लीट आणि किंग्सवेंच हे सर्व बंदिखाने जाळिले, आणि ते मोठे पेढीवरही हल्ला करण्याचे बेतांत होते, इतक्यांत लढाईचें काम शिकलेले लंडन आ- सोशिएशन या नांवाचे लोकांनीं व पुढे शिपाई लोकांम बोलावलें, त्यांनी मिळून ती धांदल बंद केली; परंतु तो करणारांतील मुख्य लोकांतून सुमारे दोनशे वीस मारिले गेले, आणि फार जखमा लागल्या. हा जमाव मिळविला ह्मणून लार्ड जार्ज गार्डन याची चौकशी झाली, परंतु त्याचे मनांत धर्माच्या गोष्टीमुळे उमेद आली होती, आणि लोकांनी दांडगाई करावी, हा त्याचा कांहीं बेत नव्हता, ह्मणून त्यास सोडून दिलें. इ०स० या वर्षांत वर्तमाने मोठी किंवा बहुतही घडली ना- १७८१ होत. इंग्लिश लोकांनी डच लोकांबरोबर लढाई आरं- भिली. वेस्ट इंडीस प्रांतांत सेंट युस्ते वियस बेट त्यांकडून इंग्लिश यांनी घेतले; परंतु पुढे लवकरच फ्रेंच लोकांनी परत घेतलें. डागर बांक याचे बाहेरचे बाजूस आ डमरल पार्कर याचे हाताखालचीं कांहीं थोडी इंग्लिश गलबतें, व आड्मरल झुमान याचे हाताखालची तित- कींच डच गलबतें यांमध्ये मोठे निकराची लढाई झाली. ती लढाई साडेतीन तासपर्यंत उभयपक्षी मोठे शौर्यानें चा- लली, परंतु शेवटीं दोघांतून कोणाचाच जय झाला नाहीं. ..