पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ ण्यावरून सरकारी साहेबांचे चौकशीकरितां कमिशनर नेमिले; आणि त्यानीं चौकशी केल्यावरून सरकारी वसूल व खर्च यांसंबंधी बहुत गोष्टींची उघडीक झाली. ५ या वर्षी पूर्वी कर्जानें व दारिद्रानें पीडित अशे एके पुरु •षानें ब्रिटिश निशाणाची अबरू वाढविली. त्याचें नांव आड्मरल राड्नी, यानें एक बळकट अरमार घेऊन जिब्राल्टर बंदरास जात असतां प्रथम स्पानिश व्यापारी गलबतांची एक मातबर टोळी घेतली; मग त्यांचे लढाऊ गलबतांचा मोड करून आडमरल डान लान्गारा याचे गलबतांखेरीज दुसरों तीन गलबतें घेतली; पुढे कांहीं महि- न्यांनीं वेस्टइंडीस प्रांतांत कौंट डीगिशेन याचे हाताखा- लचे दुसरे एक अरमाराचा मोड केला, आणि ११० तो- फांचे विडिपारीस या नांवाचें गलबत होतें तें व दुस- रींही घेतली. या त्याचे शूर कर्मासाठी त्यास लार्ड असा किताब मिळाला. या वर्षात अमेरिका देशामध्ये मुख्य गेष्टी इतक्या झाल्या. सौथक्यारोलिना प्रांतांत चार्लसटौन शहर सर हेन्री क्लिंटन व आडमरल आर्बथनाट या दोघांनीं घेतलें. लार्ड कार्नवालिस यानें जनरल गेट्स याचा पराजय केला; ब्रिटिश फौजेचा आड्जुटेट जनरल मेजर ओड़े अमेरिकन फौजेंत गुप्त वेषानें सांपडला, त्यास चोर बातमीदार ह्मणून धरून. फांशीं दिलें, आणि जनरल आर्नोल्ड अमेरिकन लोकांचा पक्ष सोडून ब्रिटिश फौ जैत आला. इंग्लिश देशांत फार वाईट आणि फजीतीचीं वर्तमानें घडली. रोमन क्याथोलिक लोकांस पार्लमेंट सभेनें