पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ला. तो परत त्यांपासून घेण्यासाठी फ्रेंच आड्मरल डेस्तें व अमेरिकन जनरल लिंकन यांनी प्रयत्न केला; परंतु मेजर जनरल प्रेवोस्त यानें तो चालू दिला नाहीं. ज- नरल वाशिंग्तन आपले संरक्षणाकरितां मात्र लपून रा हून लढाई करीत असे. सर हेनरी किंटन यानें फार युक्ति केल्या, तरी तो उघड लढाई करीना. या वर्षांत अमेरिका देशांतील संस्थानांचे तंटे बंद होण्याविषयीं दुसरा एक प्रयत्न झाला. त्या देशांत तह करण्याकरितां अर्ल क्यालैल, ईन साहेब आणि गवरनर बान्स्तन असे तिघे गृहस्थांस पाठविलें; तो तह सिद्धीस जाणार नाहीं, हे सर्वांनी पूर्वी सांगितलेच होते. तेथें पा- ठविलेले एके गृहस्थानें रोड साहेब या नांवाचे एके अमे रिकन सरदारास, तह करण्यासाठी यत्न केला असतां दहा हजार पौंड, आणि त्या देशांत राज्यांतली कोणती पाहिजे ती जागा देऊ असे जेव्हां कबूल केलें, त्या वेळेस त्यानें तो लांच असे समजून उत्तर दिलें कीं, "मी विकत घेण्यास योग्य नव्हें; परंतु मी असा असतांही ब्रिटन एथील राजास मला विकत घेण्याची शक्ति नाहीं." 66 आतां स्पेन देशचे राजानें फ्रेंच राजाप्रमाणे अमेरिकन लोकांचा स्वतंत्रपणा कबूल केला. मग त्या दोन सरका- रांचीं गलबतें एकत्र जमून इंग्लिश यांस अजिंक्य झाली. या उन्हाळ्यांत कांहीं मिलिशिया लोकही लढाईंकरितां तयार केले. या वर्षी पार्लमेंट सभेमध्यें विचार होऊन कित्येक ठि इ० स० कांणीं खर्च कमी केला; आणि कित्येक निरुपयो- १७०० गी कारखाने होते ते मोडले. प्रधानांचे सांग-