पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ या वर्षी मोठा कीर्तिमान, वक्ता, आणि उत्कृष्ट चतुर अमात्य जो अर्लचाथम, तो मृत्यु पावला. त्याने राज्यावर जे उपकार केले, त्यांविषयीं कांहीं कृतज्ञपणा दाखविण्या- करितां, त्याचे कर्जाचा फडशा करण्यासाठीं पार्लमेंट सभेनें वीस हजार पौंड दिले; त्याचा मुलगा व त्याचे कु ळांतील सर्व वारिसदार यांस वंशपरंपरेनें चार हजार पौंड प्रतिवर्षी नेमणूक करून दिली; त्याचें शरीर मोठे समारं- भानें वेस्तमिन्स्तर आवे या ठिकाणी पुरलें, आणि त्याची कबर सरकारी खर्चाने बांधण्याचा हुकूम केला. या वर्षी एक धीट पाल जोन्स या नांवाचे पुरुषानें बे- टाच्या पश्चिमेकडच्या कांठावर भय उत्पन्न केले. त्यानें वैट्हेवन बंदराजवळ उतरून तेथील एक गलबत जा- ळून शहरही जाळण्याचा यत्न केला. पुढे त्यानें स्काट्- लंड देशावर जाऊन अर्ल सेल्कर्क यांचे घर लुटलें. कांहीं १७७९ दिवसांनी सेरापिस गलबताचा क्यापटन पिर्सन याशीं लढाई करून त्यास जिंकिलें, परंतु आपल्या गल- वतांची फार खरावी झाली ह्मणून लूट घेण्याक- इ०स० रितां तो यावरून निघून जातांच ते बुडालें. क्यापटन फार्मर यानेंही फ्रेंच गलबतांशी निकराने लढाई केली; परंतु त्याचे गलबतास अकस्मात आग लागून तो व त्याचे बहुतकरून खलाशी लोक आकाशांत उडून गेले. वेस्त इंडीस प्रांतांत फ्रेंच व इंग्लिश लोकांत लढाई फार झाली. तेथें इंग्लिश यांनी त्यांपासून सेंट लुशिया बेट घेतलें, व त्यांनी इंग्लिश यांपासून डोमिनिका, सेंट- विन्सेंट व ग्रानडा हीं घेतलीं. अमेरिका देशांत कर्नल क्यांपबेल व कमोडोर पार्कर यांनी जार्जिया प्रांत घेत-