पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ राज्यांतील शाहणे लोक, व पार्लमेंट सर्भेतील प्रधानां इ० स० चे विरुद्ध पक्षाचे लोक फार दिवस जें भविष्य सां- १७७८ गत असत, तें आतां घडून आले. ते हैं की फ्रेंच लोकांनी पडदा सोडून उघड अमेरिकन लोकांचा पक्ष घेतला, आणि ते स्वतंत्र असें कबूल केलें. अमेरिका देशांत जनरल हो याचे जागेवर जनरल क्लिंटन याची नेमणूक झाली; आणि त्यानें फिलेडेल्फिया शहर सोडून न्यूयार्क प्रांतास जाण्याचा उद्योग केला. त्यावर वाटेने जनरल वाशिंग्तन यानें येऊन हल्ला केला; परंतु उभयपक्षी फारसे लोक पडले नाहीत. या लढाईत जनरल ली ह्मणून अमेरिकन सरदार होता, त्यानें त्रि- टिश फौजेवर नेहमीप्रमाणे आवेशाने हल्ला केला नाहीं, असा त्यावर आरोप येऊन, त्यास एक वर्षपर्यंत कामावरून दूर केलें. जरी ग्रेटब्रिटन व फ्रान्स या दोन देशांमध्ये रीतीप्र. माणे लढाईची प्रतिज्ञा झाली नव्हती, तथापि त्या दोन रा ज्यांमध्ये लढाईविषयीं संशय राहिला नाहीं. उभयपक्षीं अरमारांची तयारी झाली. फ्रेंच यांचे अरमारांचा सरदार डोर्विलियर्स यास नेमिलें. या दोन अरमारांची जुलै म हिन्याचे २७ वे तारिखेस गांठ पडून लहानशी लढाई झा- ली. आड्मरल केपल याचे हाताखालचा पालिसर ह्मणून सरदार होता, त्यानें केपल यावर आपले काम न केल्याचा आरोप घेतला. परंतु त्याची चौकशी होऊन तो अबरून सुटला. पालिसर यावरही आज्ञा मानिली नाहीं असा आरोप आला. त्यांतून त्यावर कांही गुन्हा लागू झाला, व कांही झाला नाहीं.