पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ , येऊन हला केला. त्यांजवरोबर त्याने मोठे शौर्याने दोन वेळ लढाई केली; परंतु त्याचे फार नुकसान झाले, आणि यांचे छावणीवर शेवटी अकस्मात् हल्ला करून त्यास धरून · कैद केले; आणि करार करून घेतला कीं, तुझी हत्यारे ठेवावीं, ह्मणजे तुह्मास आह्मी बोस्तन शहरास नेऊन, ते धून ग्रेट ब्रिटन देशास जाऊं देऊं. परंतु या लढाईत फिरून तुह्मी किंवा तुमचे लोकांनी अमेरिका देशांत चा- करीवर येऊ नये. याचे पूर्वी थोडे दिवसांवर हिंदुस्थानांत एक विलक्षण गोष्ट झाली. मद्रासेंत लार्ड पिगट ह्मणून गवरनर होता, त्यानें डरेकटर यांचे हुकुमाप्रमाणे वर्तणूक केली, ह्मणून कौन्सिल यांतील मुख्य लोकांनी त्यास धरून बंदींत ठेविलें; त्यामुळे त्याचे प्राणाविषयीही भय उत्पन्न झाले. पुढे त्या अपमानामुळे दुःख होऊन तो दुखण्यांत पडून मृत्यु पाव- ला; त्यामुळे लोकांस फार दुःख झाले, कारण, तो फार गुणी होता. या वर्षी जेम्स ऐट्किन ह्मणून जान पेंटर या नांवाने प्रसिद्ध असा पुरुष होता, त्याने पोट्स्मौथ शहरांत रोप- हौस या नांवाचे वाड्यास व ब्रिस्तल शहरांत कीलेन या नांवाचे गल्लीस आग लाविली. असे सांगतात की, इंग्लंड बेटांतील सर्व मुख्य मुख्य व्यापाराची शहरें, तेथील गोदी व गलबतें यांसुद्धां जाळावी, असा त्याचा वेत होता; परंतु तो सिद्धीस जाण्याचे पूर्वी त्यास धरून चौकशी करून त्यावर अन्याय ठरवून त्यास फांशीं दिलें, व सांखळांत टां. गून ठेविलें.