पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ Y करून तिची धांदल केली. परंतु त्यांनी आपला वंदो- बस्त करून लढाई चालू केली, ह्मणून शत्रू हटून गेले, तथापि त्यांनी बंदोबस्ताने आपला तोफखाना बरोबर घे तला. त्या लढाईंत राजाचे फौजेंतले लोक सुमारे ५०० पडले, शत्रूंचे यापेक्षां अधिक पडले. पुढे नदीचे कांठावर शत्रूनी जे किल्ले बांधिले होते, त्यामुळे सामान घेऊन फिलेडेल्फिया शहराजवळ गलव- तांचे येणें होईना, ह्मणून ते मोडण्याचा जनरल हो यानें त्या कामाकरितां हेसियन लोकांची एक वळकट टोळी पाठविली; तीतले बहुतकरून सर्व लोक शत्रूंनी जखमी केले, किंवा ठार मारिले. परंतु ते किल्ले मोडल्यावाचून हिवाळ्यांत फिलेडेल्फिया शहरांतले फौजेचा निभाव होणें कठीण, ह्मणून नदींत गलबतें पाठविली, त्यामुळे मोरच्यां- चा नाश झाला; आणि किल्ल्यांवर जमिनीकडून अक स्मात् हल्ला करण्याची तयारी केली; असे पाहून शत्रु शे- वटीं ते सोडून गेले. तथापि त्यांनी नदींत लोखंडी टो- कांच्या काठ्या पुरल्या होत्या, त्यामुळे लढाऊ किंवा मोठी गलबतें यांचे जाणे होईना. क्यानडा प्रांतांत सुमारे दहा हजार फौज, व तीत कांहीं तद्देशीय लोक होते, तिचा सरदार जनरल वर्ग- इन यानें न्यूइंग्लंड प्रांतावर हल्ला करावा, असा निश्चय केला. तो कांहीं अटकाव न होतां जार्ज आणि चांप- लिनही तळीं उतरला, आणि त्याने तिकांदरेगो किल्ला- ही घेतला. परंतु तो सारानोगा ठिकाणाजवळ आला, तेव्हां जनरल गेट्स व जनरल आर्नोल्ड यांचे हाता- खालचे न्यूइंग्लंड प्रांतांतील लोकांचे एके टोळीने त्यावर