पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ इ०स० १६१९ , अधिकाऱ्यास सहाय झाला, याकरितां लंडन शहरचा शेरिफ यास किल्ल्यावर टाकिला. कामन्स यांनीं दुसरा एक असा बेत केला कीं, धर्मसंबंधी जे को- णावर काय जुलूम असतील त्यांची चौकशी करावी, तेव्हां राजानें पार्लमेंट आपल्यास आवरत नाहीं ह्मणून त्यास निरोप दिला. त्या राजाचे सांगण्यावरून कामन्स यांचे सभेत एक सर जान फिंच ह्मणून गृहस्थ होता, त्याने जकातीविषयीं गोष्ट निघत होती, इतक्यांत राजाचा निरोप सांगितला कीं, सभेस उठून जाण्याचा निरोप झाला. तशा हा निरोप ऐकतांच अकस्मात् सर्व सभेत गलबला झाला. सभेतील मुख्यास आणि वालेटन या नांवाच्या दोन पुरुषांनी खुर्चीवर बसून गच्च दाबून धरिलें; शेवटीं सर्वांच्या संमतानें तो गडवड बंद झाली. घाईंत पोप याचे मताचे लोक आणि आमिनियन हे सरकारचे शत्रु असे ठरले. नवे कर बसविले होते, ते न्यायविरुद्ध असा निश्चय केला; आणि ज्यांनीं ते कर घे- तले, ते आणि ज्यांनी दिले ते या दोघांसही अपराधी केलें. असे अविचारीपणा करितां पार्लमेंट याचे सर्भेतले गृहस्थ सर मैल्स हाबर्ट, सर पीटर, हेमान सेल्डन, कारिटन, लांग आणि स्त्रोड, यांस राजाने धरून कैदेत टाकिले. सर जान एलियट्, हालिस, आणि वालेंटन या नांवाचे तिघांस किंग सेवेचें कोर्ट यांत येण्याकरितां बोलावूं पाठ- विले; परंतु ते ह्मणाले कीं, आह्मी उंच दरबारांत जे अन्याय केले त्यांचा जाब हलके दरबारांत येऊन करणार नाही. ह्मणून असा हुकूम केला कीं, राजाचे मर्जीस