पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 ३१ उभे राहात असे पाहून, जनरल हौ यानें दक्षिणप्रांतांत एकवेळ यत्न करून पाहण्याचा निश्चय केला. मग सु- मारें दोनों भाड्याच्या गलबतांवर आपली फौज चढवून फिलेडेल्फिया शहरास निघाला; परंतु तो डेलावेर न- दीचे तोंडाशी आला, तेव्हां त्यानें नदींत शवोदेफ्रीझ ह्मणजे लोखंडाचे टोकांच्या लांकडी काठ्या इतक्या भर- लेल्या पाहिल्या कीं, तेथून पुढे जातां येईना ह्मणून त्यानें मेरिलांड प्रांतांत एक उतार आहे, तेथें आपली फौज उतरली. त्या ठिकाणाहून तो पुढे जात असतां, त्यास जनरल वाशिंग्तन भेटला. वाशिंग्तन यास. फिलेडे- ल्फिया शहर राखण्याची फार इच्छा होती, ह्मणून त्यानें नेहमीचा बेत सोडून लढाई करावयाचा निश्चय केला. मग त्या दोन फौजांची एक दिवसपर्यंत मोठे निकरानें लढाई झाली; शेवटी इंग्लिश फौजेच्या बंदोबस्तामुळे शत्रूंचा मोड झाला. नंतर इंग्लिश फौजेनें फिलेडेल्फिया श हरास जाऊन तें घेतलें, परंतु त्या शहरापासून सुमारें सा- हा मैल अंतरावर जर्मन्टौन ह्मणून गांव आहे, तेथें बहुत- करून सर्व फौजेने तळ दिला. ब्रांडिवैन एथील लढाईंत मोड झाला असतांही, वा.. शिंग्तन यानें हीमत न सोडितां फिरून उद्योग चालवि- ला. त्यानें जर्मन्टौन गांवाहून सुमारें सोळा मैल अंत- रावर स्किपाचक्रीक ह्मणून ठिकाण आहे तेथें ठाणे दिले; आणि तेथें त्यास फौजेचा बहुत पुरावाही झाला. अक्टोबर महिन्याचे तिसरे तारिखेस तो त्या ठिकाणाहून गुप्तपणें निघाला; आणि त्याने जर्मन्टोन गांवांत सुमारें पाहांटेचे प्रहर रात्रीस येऊन राजाचे फौजेवर मोठा हला मग