पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० दिली होती. परंतु ही खर्चास पुरेना अशी झाली, ह्म- णून आजपर्यंत जो अधिक खर्च झाला होता, त्याबद्दल पांच लाख पौंड यापेक्षा अधिक पैका दिला, आणि पुढे १००००० पौंड नेमणूक वाढविली, ती सर्व मिळून आ- तां इंग्लंड देशचे राजास आपला मुलखी खर्च चालवि- ण्याकरितां प्रतिवर्षी ९००००० पौंड नेमणूक आहे. या कृत्याविषयीं कित्येक प्रधानांचेही मत काय होतें, हें काम- न्स समेतील सर फ्लेचर नार्टन यानें त्याविषयींचा हुकूम राजास देते वेळेस जें भाषण केले त्यावरून कळेल. त्यानें राजास सांगितलें कीं, “आपले विश्वासू कायन्स यांनी हे आपले प्रीतीचें चिन्ह दिले आहे, परंतु हा समय असा आहे कीं, सर्व प्रांतांवर त्यांचे सामर्थ्यापेक्षां अधिक कर . वसले आहेत." यानें आणखी सांगितले की, “त्यांनी तुह्मास आतां पैक्याचा मोठा पुरावा मात्र केला असें नाहीं, परंतु कधीं झाली नाहीं अशी, आणि आपले खर्चापेक्षाही फार अधिक नवी मोठी नेमणूकही करून दिली; परंतु महारा- ज, हे सर्व त्यांनी या भरवशावर केलें आहे की, असे उदा- रपणानें जें दिलें, तें आपण विचाराने खर्च कराल." जून महिन्यामध्ये न्यूयार्क प्रांतांत जनरल हौ यानें फि रून लढाई चालू केली; आणि शत्रूंस लढाईचा. प्रंसग आणण्याचा फार यत्न केला. परंतु जन- रल वाशिंग्तन यानें तो प्रसंग मोठ्या युक्तीनें चुकविला, ह्मणून त्याचें नांव अमेरिकन फेबियस * असे या रीतीनें शत्रु कोणतेह रीतीने समोर लढाईस पडलें. तसा हा इ०स० १७७७

  • फेवियस झणून एक पूर्वी रोमन लोकांचा सरदार होता.

शूर झणून यास तो किताव दिला.