पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ ऊशे अठरांस धरून कैद करून नेलें. त्यानें पुनः थोडे दिवसांनीं ती नदी दुसऱ्याने उतरून कर्नल माहुड सरदाराचे हाताखाली ब्रिटिश फौजेची एक टोळी होती, तींतून बहुतकरून सर्व मारिले, किंवा धरून कैद केले. असे त्याचे विजय होत चालले, याचे कारण केवळ त्याचा पराक्रम नव्हे; परंतु त्यास त्या देशाची माहीतगारी चांग ली होती हें खरें; परंतु एवढी सोई आपणास साध्य व्हा- वी याविषयीं ब्रिटिश प्रधानांनीं कांहीं उपाय केला नाहीं. आजपर्यंत फ्रान्स व स्पेन एथील सरकारांनी ब्रिटन आणि अमेरिका देशांतलीं संस्थानें यांविषयीं केवळ उदा- सीनपणा बाहेरून दाखविला होता. परंतु त्यांनी पुढे एक जी गोष्ट केली, तीवरून त्यांविषयी संशय उत्पन्न झाला. ती गोष्ट ही कीं, आपले बंदरांत अमेरिका देशचे लुटारू गलबतांस घेतलें; आणि ब्रिटिश व्यापायांपासून जी त्यांनीं बहुत लूट मिळविली होती, ती त्यास विकूं दिली. तसाच त्यांनी अमेरिकन लोकांस तोफखान्याचा पुरावा केला; आणि त्यांचे सरदार व इंजिनियरही त्या देशांत गेले, त्यामुळे शत्रूचे फौजेचें कौशल्य व वळ हीं बहुत वा त्या वेळेस तीं दोनही सरकारें फार तजविजीनें आ पलीं अरमारें वाढवीत चाललीं; तेव्हां ज्यांस कांहीं थोडें तरी समजत होतें, त्या सर्व लोकांनी पाहिले, आणि सां- गितलें कीं, ते लवकरच अमेरिकन लोकांचा पक्ष उघड रीतीनें घेतील. परंतु ही त्यांचीं भविष्यै प्रधानांनी मनास आ- णिलीं नाहींत, आणि त्यांची थट्टा व तिरस्कार केला. ढलीं. पूर्वी लिहिले की, हा राजा सिंहासनावर बसला तेव्हां ८००००० पौंड नेमणूक मुलुखी खर्चाकरितां करून