पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ पृथ्वी आपणास आपले वास्तवीक राज्याशी लढाई करणारे बंडवाले असे मानिते; ह्मणून आपणाशीं दुसरीं राज्ये को- णी बंदोबस्त करणार नाहींत. अशा गोष्टी मनांत आणून यांनी आपली स्वतंत्रत्तेची प्रतिज्ञा प्रसिद्ध केली; ती अशी कीं, आमचा व ग्रेटब्रिटन देशचा कांहीं संबंध नाहीं; आणि आह्मी स्वतंत्र आणि आपले सत्तेचें राज्य केलें. जनरल हौ, हालिफाक्स शहरांत गेला ह्मणून पूर्वी सांगितलें, तो तेथें फार दिवस राहिला नाहीं; परंतु तेथून गलबतांवरून न्यूयार्क प्रांताचे समोर आला; तेथें त्याचा भाऊ लार्ड हो, मोठे अरमार व बहुत फौजेचा पुरावा घे ऊन त्यात मिळून त्यानें शत्रूस प्रथम लांगऐलंड या बेटां- तून काढून टाकिलें, आणि मग न्यूयार्क शहरांतून हाकून दिले; आणि न्यूयार्क बेटाचे शेवटास केनिग्स ब्रिज ह्मणून ठिकाण आहे, तेथें त्यांनी मोरचा बांधिला होता, तोही त्याकडून घेतला. तशीच त्यानें वैटप्लेन्स या नां वाचे ठिकाणापर्यंत त्यांचे पाठीस लागून त्यांशी लहानशी लढाई केली; परंतु मोठी लढाई करीनात, ह्मणून त्यानें न्यूयार्क शहरास येऊन ते आपले मुख्य ठिकाण केले. त्या वेळेस कांग्रेस सभेचें वर्तमान फार कठीण झाले होते, त्यांची फौज मुदतीनें चाकरीस ठेविली होती, ती मुदत सरतांच पंचवीस हजार होती, ती तीन ह जार झाली. परंतु जनरल वाशिंग्तन यानें लवक- रच दोन पराक्रम केले. त्यांमुळे त्यांचे फौजेस हुशारी आली; व ब्रिटिश लोकांची हुशारी गेली. क्रिस्मस दिवशीं रात्रीस त्यानें नदी उतरून त्रेतन शहराजवळ हे- सियन लोक ठेविले होते, त्यांवर हल्ला करून त्यांतून न