पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ त्या गल- नव्हती, त्यामुळे दक्षिण क्यारोलिना प्रांतांत चार्ल्सटोन शहर घेण्याचा इंग्लिश यांनीं उद्योग केला. वतांचा सरदार सर पीटर पार्कर होता; आणि जमिनी- वरचे फौजेचा जनरल क्लिंटन ती फौज लांगऐलंड या नांवाचे एके बेटावर उतरली, त्या जवळच समुद्राचे फां- व्यापलीकडे सलिवान्स ऐलंड ह्मणून दुसरें एक होतें. सलिवान्स ऐलंड यावर शत्रूंनी शहराजवळ गलबतें येण्या- ची वाट बंद व्हावी; ह्मणून बळकट मोरचा बांधिला होता, त्या ठिकाणावर आड्मरल यानें मोठे शौर्याने हल्ला केला; आणि फौज एका बेटावरून दुसरे बेटावरून जाऊं लाग- ली, तो मधील समुद्राचा फांटा अठरा इंच खोल असें जें समजलें होतें, तो सात फुट खोल आहे असे कळले. ती लढाई दहा तासपर्यंत झाली; तीमध्ये कित्येक फार शूर लोक व सरदार पडले. शत्रूंचे हाती लागण्याचे भयाने एक लढाऊ गलबत जाळावे लागले; आणि इत- केंही होऊन शेवटीं तो बेत असाध्य ह्मणून आड्मरल यास सोडून द्यावा लागला. या पराजयाचे बातमीपासून इंग्लंड देशांत कोणास फारसे बरें वाईट वाटलें नाहीं; कारण कीं, त्या वेळेस प्रधान व बहुतकरून सर्व लोक रा ज्याची प्रतिष्ठा व राज्याचें हित यांची फार अनास्था क रीत असत. आतां अमेरिकन लोकांस वाटू लागले की, सांप्रत जी स्थिति झाली आहे, तीवरून आपण व आपले मूळचें सर- कार यांमध्ये फार दिवस टिकणारा, व मनापासून तह होत नाहीं. दुसरा त्यांनी असा विचार केला की, आपण त्रि- टिश सरकारची रयत असे कबूल करीत असतां, सर्व १९