पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ झाला; ह्मणून त्यांस तो उद्योग सोडून देणे अवश्य झाले, आणि पुढे लवकरच इंग्लंड देशाहून बहुत फौज आली, त्यामुळे त्यांस शेवटीं तो प्रांत अगदीं सोडावा लागला. परंतु त्या वेळेस बोस्तन शहरांतली फौज मोठे विप- तींत होती. त्या फौजेचा सरदार पूर्वी जनरल गेज ह्मणून होता, त्याचे जागेवर जनरल हौ ह्मणून झाला; तो मोठे धीराचा, लढाईमध्यें कुशल, आणि युक्ति व कावे यांतही चतुर होता, तथापि त्या जागेवर त्याचा निभाव लागेना. सर्व अमेरिका देशापासून त्याला सामानाचा थोडाही पुरावा होऊं नये असा पक्का बंदोवस्त केला; आणि इंग्लंड देशां- तलीं सामानाचीं गलबतें येण्यास वेळ लागे, आणि त्यांतून कित्येकांस शत्रू वाटेनें अडथळा करीत. सारांश, वोस्तन शहरांतली फौज व लोक हे अन्नाचे दुष्काळामुळे मरतील, असें भय उत्पन्न झालें. दुसरें अमेरिकन लोकांनी असे केलें कीं, जवळचे डोंगरावर मजबूत बुरुज बांधिले होते, त्यांवरून हिवाळा संपल्यानंतर शहरावर भडमार करूं ला- गले. पुढे लढाई आणि दुष्काळ ही दोन भयें मनांत आणून तेथील फौज, व ज्यानी त्यांचे बरा बर जाण्याचा निश्चय केला होता, असे कित्येक लोक, तें ठिकाण सोडून भाड्याचे गलवतांवर बसून थोडे दिवसांत नोवास्कोशिया प्रांतांत हलिफाक्स शहरी जा- ऊन उतरले. जनरल हौ यानें तें शहर सोडतांच शत्रूंचा सरदार जनरल वाशिंग्तन यानें तें लागलेच घेतलें, व • देशचे कित्येक इंजिनियर यांचे मदतीने त्याचा असा बंदोबस्त केला कीं, तें केवळ अजिंक व्हावे. त्या वेळेस समुद्राचे फांटे व बंदरें यांची माहीतगारी इ०स० १७७६