पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ लार्ड सभेत बोलावून तेथील गोष्टीविषयी प्रश्न केले, तेव्हां त्यानें उत्तरें दिलीं; त्यांतील सारांश हा की, तेथील संस्था- नांनीं आजूनपर्यंत आपलें राज्य स्वतंत्र होण्याचा कांहीं वेत केला नाहीं; आणि आपला व आपले मुळाचे राज्या- चा तंटा व्हावा, अशी त्यांची फार इच्छा आहे; परंतु ही त्यांची शेवटची अर्जी जर कबूल केली नाहीं. तर ते पर राज्याशीं बंदोबस्त करितील असें भय आहे; आणि जर एकदां असा बंदोबस्त झाला, तर त्यांमध्ये फूट पडण्यास फार कठीण पडेल. ही त्यानें बातमी सांगितली, तिचा कांहीं विचार केला नाहीं; आणि अर्जीविषयीं प्रधानांनी सांगितले की, तिचें उत्तर आह्मी कांहीं देत नाहीं. अगोदरच बँकर्सहिल टेकडीवर आपण पराक्रम केला, हा अमेरिकन लोकांस मोठा गर्व झाला होता; तशांत असा त्यांचा ब्रिटिश सरकारापासून अपमान होतांच त्यांनी लढाईचा निश्चय केला. ब्रिटिश प्रधानांस त्यांचा धीर व तयारी याची माहीतगारी नव्हती; आणि त्यांशीं जो तंटा होता, तो सर्व बंद करण्यासही संधी चांगली होती, परंतु ती एकदां गेल्यावर पुनः कधीं आली नाहीं. पुढे अमेरिकन लोकांस आपले संरक्षणाचाच उद्योग पुरे होईना असा झाला. न्युइंग्लंड व न्यूयार्क या प्रांतां- तील मिलिशिया लोकांची एक टोळी, जनरल मांदगा- मरी व आर्नोल्ड या दोन सरदारांखालची, क्यानडा प्रांतांवर गेली. त्यांनी शांब्ली व सेंटजान हे किल्ले, आणि मोत्रिआल शहर, हीं घेतलीं. त्यांनी क्वेवेक शह- रावर अकस्मात् हला करून घेण्याचा उद्योग केला; परंतु लढाईत मांदगामरी मेला. आणि आर्नोल्ड जखमी