पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ सभेचे हुकूम फिरल्यावांचून, आह्मी शस्त्रे ठेवणार नाहीं, अशी प्रतिज्ञा प्रसिद्ध केली. वर्जिनिया प्रांताचा वकील वाशिंतन साहेब यास सर्व अमेरिकन फौजेचा सरदार नेमिलें. परंतु मुळचे राज्यापासून वेगळे होण्याची आपली इ- च्छा नाहीं, असें दाखवावयाकरितां त्यांनीं ग्रेट ब्रिटन एथील लोकांस एक पत्र, अयर्लंड बेटांतील लोकांस एक पत्र, व राजास एक अर्जी, ही पाठविली. त्या सर्वांमध्ये लि- हिलें कीं, आमचे सरकारापासून वेगळे होण्याची आमची इच्छा नाहीं; आणि वास्तविक व चांगला करार होऊन एकी व्हावी, यावांचून दुसरी कोणती गोष्ट आमचे मनांत नाही. बहुत लोकांस त्या वेळेस वाटले की, त्यांचे ह्मट- ल्याप्रमागें, व इंग्लंड देशाची प्रतिष्ठा कमी न होतां करार करितां येईल; व बहुतांनी कित्येक करार करून पार्लमेंट सभेस कळविलें, परंतु ते सर्व रद्द पडले. त्या वेळेस प्रधानांनीं असा वेडा निश्चय केला कीं, सर्व अमेरिका देश शस्त्राचे वळानें स्वाधीन करावा, ही गोष्ट कधीं घडावयाजोगी नव्हती; आणि घडली असती, तरी त्या देशांतून जो नफा होणार, तो त्याचे संरक्षणाकडे खर्च झाला असता; परंतु त्या वेळेस प्रधानांस मोठा श्रम पडला होता. अमेरिका देशांत पेन्सिल्वेनिया प्रांताचें संस्थान ज्या पुरुषानें स्थापिलें, त्याचे वंशांतला, त्या प्रांताच्या मा- लकांतील द्रव्यवान व बहुश्रुत पेन या नांवाचा पुरुष इंग्लंड देशांत आला होता. त्यानें कांग्रेस या सभेची शेवटची अर्जी राजास देण्याकरितां आणिली होती. या पुरुषाचे सांगण्यावरूनही प्रधानाचे डोळे उघडले नाहीत. त्याला