पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ बोस्तन शहराचे जवळ बंकर्सहिल या नांवाची एक टेकडी आहे, त्या टेकडीवर जून महिन्याचे एके लहान रात्रीस अमेरिकन यांनीं मोरचा बांधिला. त्या ठिका णापासून शहरास व बंदराचे लोकांस फार उपद्रव होईल, ह्मणून त्यास तेथून काढण्याकरितां जनरल हो आणि पिगट या दोन सरदारांबरोबर दोन हजावर लोक देऊन त्यांस पाठविलें. नंतर गलवतांपासून व बोस्तन शहरांत कोप्साहिल ह्मणून ठिकाण आहे, तेथून तोफांचा मार झाला. हा मार अमेरिकन यांनी मोठे धीरानें सो- शिला. राजाची फौज मोरच्याजवळ येईपर्यंत त्यांनी गोळे मारिले नाहींत. ती तेथे गेल्यावर त्यांनी तीवर तोफा चालू केल्या. त्यामुळे राजाचे फौजेची धांदल झाली; आणि तीतील कित्येक फार शूर सरदार मेले गेले. तथापि फौ- जेनें तत्क्षणी बंदोबस्त करून त्यांचा मोरचा चहूंकडून मोडला, आणि अमेरिकन यांस तेथून काढून देशास घा- त्या लढाईंत फौज सुमारें अर्धी मेली गेली व ज- खमी झाली. ती सर्व मिळून संख्या एक हजार चौपन या लढाईंत सरदार फार पडले, याचें कारण असे सांग- तात की, अमेरिकन लोकांचे फौजेत निशाण अचुक मारावयास शिकविलेले कित्येक लोक होते. लविलें. · न्यूइंग्लंड प्रांतांतील लोकांनी या प्रसंगी शौर्य प्रगट केले, त्यामुळे कांग्रेस या सभेस पुढेही लढाईची तयारी चालविण्यास उमेद आली. कांही दिवसांपूर्वी त्यांनी एक फौज जमवून तिला पगार देण्याची आज्ञा केली होती, आणि आतां त्यांनी लढाई करण्याची आपली कारणे आणि आपणावरचे जुलूम बंद झाल्यावांचून, ह्मणजे पार्लमेंट