पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ शहरास पोचेपर्यंत त्यांची फार दुर्दशा झाली. त्या लढाई- मध्यें राजाचे फौजेंतले ६५ लोक मेले, ते व जखमी आ णि बंदिवान वगैरे मिळून एकंदर दोनशे व्याहात्तर नाहीं असे झाले. अमेरिकन यांचे सुमारे चाळीस मेले, व वीस जखमी झाले. या लढाईची बातमी देशांत जिकडे तिकडे कळतांच सर्व मुलूख एकदांच लढावयास तयार झाला, आणि थोडे दिवसांत बोस्तन शहरास सुमारें बीस हजार मिलिशिया लोकांचा वेढा पडला. लेक संगतन एथील वर्तमान, व बो- स्तन शहराचा वेढा, या दोन गोष्टी कांग्रेस या सभेचे कानास जातांच तिनें न्यूइंग्लंड प्रांतांतले लोकांची सर्व कृत्यें मान्य केलीं; आणि विचार ठरविला कीं, सरकार व मासाशसेट्स एथील लोकांमध्ये जो संबंध होता तो सुटला. फौजेस किंवा अरमारास, किंवा भाड्याचे गल- बतांस सामानाचा पुरावा करण्याची लोकांस त्यांनी अगदीं मनाई केली. ब्रिटिश सरकाराविषयीं आपला तिरस्कार उघड करावयाकरितां, जो डाक्तर फ्रांलिन यांस इंग्लंड देशांत त्या जागेवरून अप्रतिष्ठेनें काढिले होतें, त्यास नवा एक डांकेचा कारखाना करून त्यांवर मुख्य नेमिलें, व हान्काक आणि आडम्स साहेब यांवांचून जे कोणी हत्यारे ठेवून आपले कामावर येतील, त्या सर्वस क्षमा मिळेल, असा जनरल गेज यानें जाहीरनामा लावितांच, त्यांनी हान्काक •साहेबास प्रेसिडेंट नेमिलें. इ०स० या वेळेस उपाय लवकर होईल, अशा आतां १७७५ गोष्टी राहिल्या नव्हत्या, ह्मणून उभयपक्षों परस्परांचा एकदांच मोड करण्याची संधि पाहात होते.