पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रांतले लोकांनी नूतन धर्म घेतला होता; ह्मणून त्या शह रावर जाऊन मोठी फौज पडली. अशी सोई असतांही तो ड्युक यानें फार मूर्खपणा केला; त्यामुळे लोकांनी त्रा- सून शहरचे दरवाजे लाविले; आणि त्यास आंत घेतलें नाहीं; कारण इंग्लिश आपले मदतीस येतात, हे त्यांस अगोदर समजलें नाहीं. ओलीरान बेटांतील जमीन चांगली होती, आणि तेथें कांहीं बंदोबस्त नव्हता. ह्मणून तो ड्युक यानें जाऊन तेथें हल्ला करावा, तो न करितां दुसरे री ह्मणून चांगलें बंदोबस्ताचे ठिकाण होतें, तेथें तो गेला; आणि मसलत केली कीं, सेंट मार्टिन याच्या कि ल्यांतले लोकांस धान्यादिकांचा तोटा पाडून उपाशी मा- रावें. परंतु त्यांस समुद्राचे वाटेने पुष्कळ सामान पोहो- चत असे. त्या वेळेस फ्रेंच यांनीं बेटाचे दुसरे बाजूकडून लोक आंत शिरविले. ह्मणून शेवटीं बकिंगम यास पळून जाणे प्राप्त झाले. ते इतके त्वरेनें की, त्याची फौज गलबतावर चढावयाचे अगोदर तींतून दोन तृतीयांश मा- रिले गेले. तो ड्युक असा धीराचा मनुष्य होता कीं, सगळ्यांचे मागून तो गलबतावर चढला. तो शूर होता खरा; परंतु त्याचे शौर्येकरून राज्याची अपकीर्ति झाली. पुढे उत्तरोत्तर राजा आणि कामन्स यांमध्ये तंटा फा- रच वाढला. जकातीचे अधिकाऱ्यांस बोलावून आणून का- मन्स यांनी चौकशी केली कीं, जे व्यापारी जकात देई- नात त्यांची संपत्ति तुह्मी कोणाचे हुकुमानें जप्त केलीत ? कर वसविण्यास सरकारचा हुकूम नसतां, त्याविषयों तुह्मी कशावरून हुकूम केलात असें कर घेणारे जे मुख्य अधिकारी होते, त्यांस विचारिलें आणि अरमारांचे