पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ एक फिलेडेल्फिया शहरांत मोठी राजसभा जमविली, तीमध्ये आपले वकील पाठविले. त्या सभेनें आपले नांव कांग्रेस असे ठेवून इंग्लिश राजाजवळ फिर्याद केली कीं, आह्मावर जुलूम चालले आहेत हे बंद व्हावे. पुढले वर्षी जार्जिया प्रांतही त्या संस्थानांत मिळाला. असे ते प्रांत मिळून पुढे लवकरच इंग्लिश सरकारावर बंड करून आ पण स्वतंत्र राज्य असे झाले. राज्य सभेनें राजाजवळ फिर्याद केली होती, तेवढ्यानेंच संतुष्ट न होतां बोस्तन बंदराविषयींचा कायदा व दुसरा जुलूम बंद होण्याकरितां न्यूइंग्लड प्रांताचे लोकांस संकटसमयी मदत कबूल केली. प्रांताचे लोकांचा स्वभावही याविषयी अनुकूळ होता; आणि त्यांनीं धर्माविषयीं स्वतंत्र होऊन फार दिवस मनांत इच्छिले होतें कीं, राज्याविषयींही आपण स्वतंत्र असावें. O ब्रिटन व अमेरिका देशांतील संस्थानें, यांमध्ये इतके दिवस जें वांकडे पडले होतें, तें आतां उघड झाले. मासा- शसेट्स एथील अंमलदार जनरल गेज यानें कांकर्ड या नांवाचे ठिकाण वंडवाल्यांनी लढाऊ सामान जमविलें आहे, असें ऐकून त्यांचा नाश करावयास फौजेची एक टोळी पाठविली. त्या टोळीस कांकर्ड यापासून सुमारें साहा मैल अंतरावर लेक्सिंगतन शहराजवळ मिलिशिया लोकांतून कित्येक भेटले. त्यांमध्यें व राजाचे फौजेमध्यें कांहीं गोळागोळी झाली, तींत आठ अमेरिकन लोक मेले, व कित्येकांस जखमा लागल्या. नंतर त्या टोळीने आणखी कांहीं विघ्न न होतां कांकर्ड एथे जाऊन तेथील सामानाच नाश केला; परंतु परत येत असतां अमेरिकन यांचे एके मोठे टोळीनें येऊन त्यांवर हल्ला केला; आणि ते बोस्तन